Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध गायक वादाच्या भोवऱ्यात; गाण्यात महिलांविषयी अपशब्द वापरल्यामुळे आला अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 10:51 IST

Jazzy b: 'जिने मेरा दिल लुटैया' फेम जॅझी बी याने त्याच्या गाण्यात महिल्यांविषयी 'या' अपशब्दाचा वापर केला.

गेल्या काही काळात तरुणाईमध्ये पंजाबी गाण्यांची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे अनेक पंजाबी सिंगर सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. यामध्येच एक लोकप्रिय पंजाबी गायक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या गायकाने त्याच्या गाण्यात महिलांविषयी अपशब्द वापरल्यामुळे  महिला आयोगाने त्याचा गाण्यावर आक्षेप घेतला आहे.प्रसिद्ध कॅनेडियन पंजाबी गायक जॅझी बी (jazzy B) हे नाव सध्याच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. आतापर्यंत जॅझी बी ची अनेक गाणी सुपरहिट झाली आहे. यामध्येच त्याचं मडक शौकीनां दी हे गाणं रिलीज झालं. हे गाणं युट्यूबरवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात लोकप्रिय झालं.  ३ मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज या गाण्याला मिळाले. पण, या गाण्यात महिलांविषयी अपमानकारक शब्द वापरल्यामुळे पंजाब महिला आयोगाने त्यावर कारवाईची मागणी केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी पंजाब पोलिसांकडे आठवड्याभरात याबाबतचा रिपोर्टही मागितला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

जॅझी बीच्या मडक शौकीनां दी या गाण्यात त्याने महिलांचा उल्लेख भेड (मेंढी) असा केला आहे. या शब्दावर महिला संघटनांनी आक्षेप घेतला आहे. इतकंच नाही तर पंजाबमधील अनेक भागांमध्ये त्याचा पुतळा जाळण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची दखल घेत पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा राज लाली गिल यांनी या प्रकरणाचा रिपोर्ट पंजाब पोलिसांकडे मागितला आहे. याबाबत जॅझीने अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यापूर्वीही तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

दरम्यान, जॅझी बी याची 'जिने मेरा दिल लुटैया', 'नाग', 'जवानी' ही गाणी प्रचंड गाजली आहेत. तसंच 'तिसरी आँख' या बॉलिवूडसिनेमातही त्याने कॅमियो रोल केला होता.  

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजनसंगीत