Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 08:57 IST

जान्हवी कपूर होणार सुशीलकुमार शिंदेंची नातसून, लग्नाबद्दल म्हणाली...

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत (Shikhar Pahariya) लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. जान्हवीची तिरुपती बालाजीवर विशेष श्रद्धा आह. तिरुपती मंदिरातच ती लग्न करणार अशीही चर्चा सुरु होती. आता जान्हवीने स्वत:च या चर्चांवर मजेशीर प्रतिक्रिया देत सर्वांची बोलती बंद केली आहे.

इन्स्टाग्रामवर पापाराझींच्या एका पोस्टमध्ये जान्हवीच्या लग्नाची एक डिटेल पोस्ट होती. जान्हवीला लग्नात कांजीवरम साडी नेसायची आहे, केसात मोगरा माळायचा आहे. संपूर्ण कुटुंबियांच्या साक्षीने तिला शिखर पहाडियासोबत तिरुपती बालाजी मंदिरात सातफेरे घ्यायचे आहेत. तसंच शिखरने लग्नाच पारंपरिक लुंगी परिधान करावी अशी तिची इच्छा आहे. अशी सर्व माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता या पोस्टवर जान्हवीने स्वत:च दोनच शब्दात कमेंट केली आहे. 'कुछ भी(काही पण)' अशी कमेंट करत तिने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. बऱ्याच वर्षांपासून जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत आहे. मधल्या काळात जान्हवीच्या बॉलिवूड पदार्पणाआधीच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. मात्र शिखरकडून नातं संपलं नव्हतं. तो तरीही जान्हवीची वाट पाहत होता असं स्वत: जान्हवीनेच 'कॉफी विद करण' मध्ये सांगितलं होतं. नंतर दोघं पुन्हा एकत्र आले. आता दोघंही सार्वजनिक ठिकाणीही हातात हात घालून येतात. जान्हवी 'शिखू' या नावाचं पेंडंटही गळ्यात घालते. मात्र अद्याप त्यांचा लग्नाचा प्लॅन नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

जान्हवी आगामी 'देवारा पार्ट 1', 'RC16' या साऊथ सिनेमांमध्ये झळकणार आहे. या दोन्ही सिनेमांतून तिला रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. शिवाय तिचा राजकुमार रावसोबत 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा येणार आहे. तसंच वरुण धवनसोबत ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चं शूट करत आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरलग्नबॉलिवूडरिलेशनशिप