विकी कौशलचा बॉलिवूडचा पहिला सिनेमा असलेला 'मसान' चांगलाच गाजला. या सिनेमाचा विषय आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या जवळचा विषय आहे. 'मसान'नंतर दिग्दर्शक नीरज घायवानच्या नव्या सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाचं नाव आहे 'होमबाऊंड'. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहताच प्रेक्षकांनी रिलीजच्या आधीपासूनच या सिनेमाला चांगली पसंती दिली आहे. काय आहे या ट्रेलरमध्ये?'होमबाऊंड'च्या ट्रेलरची चर्चा
'होमबाऊंड'च्या ट्रेलरमध्ये ईशान खट्टर आणि विशाल जेठवा हे दोघे बालपणीचे मित्र दिसतात. दोघांचंही पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी ते खूप मेहनतही करतात. परंतु काही कारणास्तव त्यांना भ्रष्ट व्यवस्थेचा स्थापना करावा लागतो. त्यामुळे दोघेही नाउमेद होतात. या सिनेमात ईशान मोहम्मद शोएबचे पात्र साकारत आहे, तर विशाल चंदन कुमारच्या भूमिकेत आहे. या दोन्ही मित्रांची स्वप्नं आणि त्यांचा संघर्ष याची झलक 'होमबाऊंड'च्या ट्रेलरमध्ये दिसते. हा ट्रेलर डोळ्यात पाणी आणणारा आहे. सिनेमात जान्हवी कपूरचीही विशेष भूमिका दिसते
be.com/embed/WojNkusud84?si=jtxWUtZ0sESk1Gzy" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen>
मैत्री आणि संघर्षाची गाथा
'होमबाऊंड'चा ट्रेलर हे स्पष्ट करतो की, हा सिनेमा फक्त मनोरंजनासाठी नाही, तर जीवनातील संघर्ष आणि स्वप्नांची कथा देखील आहे. मोहम्मद शोएब आणि चंदन कुमार यांसारख्या तरुणांच्या स्वप्नांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी, त्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद चित्रपटात दाखवली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने 'होमबाऊंड'ची निर्मिती केली आहे. या सिनेमाला जागतिक स्तरावर खूप प्रसिद्धी मिळाली आहे. २६ सप्टेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्वांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे.