Join us
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही मला सोडून गेल्यानंतर..."; धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी हेमा मालिनी भावुक; मनातील भावना केल्या व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:51 IST

धर्मेंद्र यांची आज पहिली जयंती. त्यानिमित्त हेमा मालिनींनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. हेमा यांची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येतील

 २४ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. आज ८ डिसेंबरला धर्मेंद्र यांच्या जयंतीनिमित्त त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र आज हयात असते तर त्यांच्या ९० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं असतं. परंतु दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत.

हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही जुने आणि आनंदी क्षण असणारे फोटो शेअर केले. त्या लिहितात, "माझं प्रेमळ हृदय धरमजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मला सोडून गेल्यानंतर दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे आणि मी तुटलेलं मन घेऊन हळूहळू आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही माझ्या आत नेहमी माझ्यासोबत असाल, हे मला माहीत आहे."

त्या पुढे लिहितात, "आपण एकत्र घालवलेल्या आनंददायी आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत. त्या आठवणींमध्ये जगताना मला खूप दिलासा आणि आनंद मिळतो. इतकी वर्ष आपण एकत्र जे सुंदर क्षण जगले आणि आपल्या प्रेमाचं प्रतीक करणाऱ्या आपल्या दोन सुंदर मुली, यासाठी मी देवाचे आभार मानते. या आठवणी कायम माझ्या हृदयात राहतील. तुमच्या वाढदिवसानिमित्त मी देवाकडे प्रार्थना करते की, तुमची नम्रता, चांगुलपणा आणि माणुसकीवरील तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला शांती आणि आनंदा मिळावा."अशाप्रकारे हेमा मालिनींनी धर्मेंद्र यांच्याविषयी भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये हेमा मालिनींनी दोन फोटो पोस्ट केले आहेत. यापैकी एका फोटोत हेमा मालिनी आनंदात धर्मेंद्र यांना केक भरवताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत हेमा आणि धर्मेंद्र यांनी फोटोसाठी खास पोज दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hema Malini's Emotional Tribute to Dharmendra on His Birthday

Web Summary : Hema Malini shared a touching post on Dharmendra's birthday, expressing her grief and reminiscing about their joyful memories. She prays for his peace and happiness, cherishing their love and beautiful daughters.
टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीसनी देओलबॉबी देओलइशा देओलबॉलिवूडमृत्यू