Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गदर 2' च्या पार्टीत तीनही खान दिसले पण 'खिलाडी' गायब; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 10:22 IST

'गदर 2' आणि 'ओह माय गॉड 2' च्या क्लॅशमुळे अक्षय कुमार पार्टीत आला नाही?

सनी देओल (Sunny Deol)आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' (Gadar 2) सिनेमाने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. ११ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सिनेमाने ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. सनी देओलचीबॉलिवूडमध्ये परत आली आहे. या अभूतपूर्व यशानंतर सनी देओलने ग्रँड पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत अख्खं बॉलिवूड आलं होतं. तीनही खानच्या हजेरीने तर सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. या पार्टीत 'खिलाडी'दिसला नाही हे सर्वांच्याच लक्षात आलं. अक्षय कुमार (Akshay Kumar) पार्टीत गैरहजर का राहिला याचं कारण समोर आलं आहे.

११ ऑगस्ट रोजी सनी देओलचा 'गदर 2' रिलीज झाला. तर याच दिवशी अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' (OMG 2) सुद्धा प्रदर्शित झाला. 'गदर 2' ने बॉक्सऑफिसवर धुमाकूळच घातला. तर 'ओह माय गॉड 2' नेही चांगली कमाई केली. मात्र 'ए सर्टिफिकेट' दिल्याने सिनेमाला काहीसा फटका बसला. बॉक्सऑफिसवरील या क्लॅशमुळेच 'खिलाडी' अक्षय कुमार पार्टीत गैरहजर राहिला अशी चर्चा सुरु झाली. मात्र याचं खरं कारण वेगळंच आहे.

अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. 'गदर 2' च्या पार्टीसाठी तो मुंबईत नव्हता. अक्षय सध्या लखनऊमध्ये 'स्काय फोर्स' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. यामुळे त्याला पार्टीला येता आलं नाही. मात्र त्याने फोन करुन सनीला शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे अक्षय कुमारने चित्रपटाच्या रिलीजनंतर 'ओह माय गदर' अशी पोस्ट करत दोन्ही सिनेमाचं प्रमोशन केलं होतं. अक्षयच्या या कृतीचं कौतुक झालं होतं.

टॅग्स :अक्षय कुमारसनी देओलबॉलिवूडशाहरुख खान