Join us

'फायटर' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 13:24 IST

खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे.

अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रोज नवनवे रेकॉर्ड तोडत असून कोट्यवधींची कमाई करत आहे.  प्रेक्षक आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आहे, ते OTT वर पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. यातच आता 'फायटर' च्या ओटीटी अधिकारांची माहिती समोर आली आहे. 

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर 'फायटर' लवकरच ओटीटवर प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Netflix ने 'फायटर'  चे OTT अधिकार विकत घेतले आहेत. चित्रपटाची स्ट्रीम डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण हा चित्रपट मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होऊ शकतो. नेटफ्लिक्सने 'फायटर'चे हक्क मोठ्या रकमेत विकत घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या कराराची रक्कम अद्याप समोर आलेली नाही. खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे.

'फायटर'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याशिवाय या चित्रपटात अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर, आकर्ष अलग आणि संजीदा शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'फायटर'चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.  तर सिनेमाची निर्मिती ही वायकॉम 18 स्टुडिओच्या बॅनरखाली केली गेली आहे.  25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त 'फायटर' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यापासून सिनेमा जोरदार कमाई करत आहे.  

टॅग्स :हृतिक रोशनदीपिका पादुकोणसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा