Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ती नशेत होती आणि मी नकार देत असतानाही..'; फातिमा सना शेखला पार्टीत आला विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 12:10 IST

Fatima sana shaikh: या प्रकारानंतर फातिमा सना शेख प्रचंड घाबरली आणि घरी जाऊन खूप रडली होती.

बॉलिवूडची दंगल गर्ल अर्थात अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) सध्या तिच्या 'सॅम बहादूर' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला आहे. अलिकडेच या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने फातिमाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका मुलीने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक खुलासा केला. इतकंच नाही तर या प्रकारामुळे फातिमा प्रचंड घाबरुन गेली होती.

फातिमा सना शेख हिने अलिकडेच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने, एका मुलीने दारुच्या नशेत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर फातिमा तिला नकार देत असतानाही ती जबरदस्तीने तिचा मेकअप करत होती.

"ती मुलगी प्रचंड नशेमध्ये होती. मला माहित नाही ती कुठून, कशी आली. पण, तिने पहिले माझ्या डोळ्यांवर लायनर लावलं. त्यानंतर ती माझे केस बांधण्यासाठी हट्ट करु लागली. मी तिला सांगितलं, 'बाई आधीच तू मला लायनर लावलं आता केस नाही बांधू शकत'. तर, त्यावर ती, तुझा चेहरा चांगला आहे पण केस विस्कटले त्यामुळे ते विचित्र दिसतायेत असं म्हणाली आणि केस बांधू लागली. मी नकार देत होते पण ती ऐकतच नव्हती.", असं फातिमाने सांगितलं.

पुढे ती म्हणते, "माझ्या मित्राचा एक मित्र होता त्याच्या पार्टीत मी गेले होते. त्यामुळे तिथे मी कोणालाच ओळखत नव्हते. त्यावेळी मला जाणवलं की लोक कशाचीच मर्यादा पाळत नाहीत. ते लोक फारच बेशिस्त होते आणि हे सगळं चुकीचं होतं. त्या मुलीने माझा विचित्र पद्धतीने मेकअप केल्यानंतर सांगितलं की ती ह्यूमन राइट्ससाठी काम करते. तिचं हे वाक्य ऐकून मला असं वाटलं की, अगं तुला लाज वाटली पाहिजे. या प्रकारानंतर मी घरी आले आणि खूप रडले."

दरम्यान, फातिमा सना शेख हिने 'चाची 420' या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. या सिनेमात तिने भारतीची (तब्बूच्या तरुणपणीची) भूमिका साकारली होती. त्यानंतर ती २०१६ मध्ये दंगल या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली. या सिनेमानंतर ती ठग्स ऑफ हिंदुस्तान, लुडो, सूरज पर मंगल भारी, अजीब दास्तां, थार यांसारख्या सिनेमांमध्ये दिसली.

टॅग्स :फातिमा सना शेखबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा