Farah Khan Movie: बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यात रोमकॉम चित्रपटांचा एक वेगळाच चाहतावर्ग असतो. आजवर असे अनेक चित्रपट आले मात्र, त्यातील असेही काही चित्रपट आहेत ज्यांना बॉक्स ऑफिसवर तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.असाच एक चित्रपट म्हणजे 'तिस मार खान' आहे. फराह खानने दिग्दर्शन केलेला 'तिस मार खान' हा चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झालेला.मात्र, अपेक्षेप्रमाणे चित्रपटाला यश न मिळाल्याने फराह खान प्रचंड नाराज झाली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत फराहने 'तिस मार खान' च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाली आहे.
फराहसाठी 'तिस मार खान' चित्रपटाचं अपयश हा एक मोठा धक्का होता. यामध्ये अक्षय खन्ना व कतरिना कैफ मुख्य भूमिकांमध्ये होते; तगडी स्टारकास्ट असूनही चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. नुकत्याच रणवीर अलाहाबादियाच्या मुलाखतीमध्ये फराह खानने खुलासा केला की, चित्रपटाच्या अपयशामुळे आणि टीकेमुळे ती खचून गेली होती. तिचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. तेव्हा फराह म्हणाली, "अशा गोष्टींमुळे तुम्ही खूप काळासाठी मागे पडता. तुम्ही त्यातून सावरता, पुन्हा कामाला लागता, पण तुमच्या मनातून मागच्या गोष्टींमध्येच अडकलेले असता. तुम्ही स्वतःवर शंका घेत नाही, पण लोक तुम्हाला तसं करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात".
'तिस मार खान'च्या अपयशामुळे फराह खूप खचली होती. जवळपास ६ दिवस स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं. त्या दिवसांबद्दल सांगताना दिग्दर्शिका म्हणाली,"मी पाच ते सहा दिवस अंथरुणातून उठूही शकले नाही. मी सतत रडत होते. सुदैवाने, त्यावेळी फक्त ट्विटर होते. पण, आपले असे काही मित्र नेहमीच असतात ज्यांच्याकड़ून तुम्हाला कळतं की बाहेर तुमच्याबद्दल कोण काय म्हणत आहे. यामुळे तुम्हाला राग येतो, मग दुःख होते आणि कधीकधी पॅनिक अटॅकसुद्धा येतात, कारण पहिल्यांदाच या सगळ्याला सामोरं जात असता."
दरम्यान, फराह खान असंही म्हणाली की अशा गोष्टी आयुष्यात घडणं देखील गरजेचं आहे. कारण, सतत यश मिळालं तर माणसाला त्याची किंमत कळत नाही. अशा भावना फराह खाननं व्यक्त केल्या.
Web Summary : Farah Khan opened up about the failure of 'Tees Maar Khan'. The film's failure deeply affected her, causing her to isolate herself for days. She acknowledged that failures are crucial for growth.
Web Summary : फराह खान ने 'तीस मार खान' की विफलता के बारे में खुलकर बात की। फिल्म की विफलता ने उन्हें गहराई से प्रभावित किया, जिससे वह कई दिनों तक अलग-थलग रहीं। उन्होंने स्वीकार किया कि असफलताएँ विकास के लिए महत्वपूर्ण हैं।