Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियात 'देसी गर्ल'चा सन्मान, एका प्राण्याला देण्यात आलं प्रियंका चोप्राचं नाव! कोण आहे हा नशीबवान प्राणी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 10:32 IST

सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय.

'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) ही कायमच चर्चेत असते. सध्या प्रियंका बॉलिवूडसहहॉलिवूड गाजवतेय. जगभरात तिचा मोठा चाहता वर्गही आहे. तुम्हाला माहितेय ऑस्ट्रेलियात एका प्राण्याचे नाव हे प्रियंका चोप्राच्या नावावर ठेवण्यात आले आहे. खुद्द देसी गर्ल देखील हे जाणून आश्चर्यचकित झाली. तिनेच ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने त्या प्राण्याचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्रियंका सध्या तिच्या आगामी 'द ब्लफ' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शुटिंग हे ऑस्ट्रेलियात (Priyanka Chopra In Australia) सुरू आहे. चित्रपटाच्या शुटिंगमधून काही वेळ काढत प्रियंकानं  तिच्या मित्रांसह ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथील पॅराडाइज कंट्रीला भेट दिली. यावेळी तेथील वन अधिकाऱ्यानं प्रियंकाला सांगितलं की तिच्या नावावरुन 8 महिन्यांचा लहान कोआलाचं (Koala ) नाव ठेवण्यात आलं आहे. प्रियंकानं या बेबी कोअलाचे फोटो शेअर केले आहेत. 

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर बेबी कोअलाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'महिन्यांच्या कोआला जोईचे नाव माझ्या नावावरुन ठेवण्यात आले आहे! किती क्युट… या सुंदर भेटीसाठी आणि वन्यजीवांची ओळख करून दिल्याबद्दल पॅराडाईज कंट्रीचे आभार. मीरकाट्स, कोआला, कांगारू, तस्मानियन डेव्हिल आणि डिंगो! ऑस्ट्रेलियातील वन्यजीव राखीव ठेवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या सर्व कामांसाठी धन्यवाद'. प्रियंकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. 

 'द ब्लफ' सिनेमासाठी प्रियंका खूप मेहनत घेत आहे.  'द ब्लफ'मधील स्टंट सीन शूट करताना ती अनेकदा जखमी झाली. लवकरच तिचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियंकाने 'बेवॉच' या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'लव्ह अगेन', 'द मॅट्रिक रिसेरक्शन', 'इज नॉट इट रोमँटिक', 'ए किड लाइक जेक', 'क्वांटिको' या सिनेमांमध्ये ती दिसली. 'सिटाडेल' या वेब सीरिजमध्येही प्रियांकाने काम केलं आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रासेलिब्रिटीबॉलिवूडहॉलिवूडआॅस्ट्रेलिया