Join us  

दिव्या खोसला घटस्फोट घेणार नाही, नावातून 'कुमार' काढल्याचं खरं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:58 AM

दिव्या आणि भूषण कुमार यांचा घटस्फोट होणार नाही हे समजल्यावर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

टीसीरिजचे(Tseries) संचालक भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि पत्नी दिव्या खोसला (Divya Khossla) यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा कालपासून सुरु होती. याचं कारण म्हणजे दिव्याने सोशल मीडियावर नावातून 'कुमार'काढलं. तसंच तिने इन्स्टाग्रामवरुन TSeries ला अनफॉलो केलं. यामुळे बॉलिवूडमध्ये आणखी एक घटस्फोट होतो का अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र दिव्याच्या या कृतीमागचं खरं कारण समोर आलं आहे. 

भूषण कुमार आणि दिव्या खोसला गेल्या १९ वर्षांपासून लग्नबंधनात आहेत. २००५ सालीच त्यांचं लग्न झालं. तसंच दिव्याच्या करिअरमध्ये  भूषण कुमार यांचा मोठा वाटा आहे. आजही ते तिला खूप पाठिंबा देतात. मग अचानक दिव्याने सोशल मीडियावरुन कुमार आडनाव का काढलं असा प्रश्न सर्वांना पडला. टीसीरिजच्या प्रवक्त्याने खुलासा केला की, दिव्याने ज्योतिषाच्या सांगण्यावरुन कुमार हे आडनाव काढलं आहे. तसंच तिने खोसला या स्पेलिंगमध्ये आणखी एका s चा समावेश केला आहे.हे सर्व तिने ज्योतिषाच्या सल्ल्यावरुनच केलं आहे. तसंच इन्स्टाग्रामवर ती भूषण कुमार यांचं वैयक्तिक अकाऊंट अजूनही फॉलो करते अशी माहितीही तिने दिली आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. 

दिव्या आणि भूषण कुमार यांचा घटस्फोट होणार नाही हे समजल्यावर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सध्या अनेक कपल लग्नानंतर कित्येक वर्षांनी घटस्फोट घेत आहेत. ईशा देओल-भरत तख्तानी, ईशा कोप्पिकर-टिम्मी नारंग, सानिया मिर्झा-शोएब मलिक ही सेलिब्रिटींची ताजी उदाहरणं आहेत.

दिव्या आणि भूषण यांची लव्हस्टोरी

'अब तुम्हारे हवाले वतन साथियो' सिनेमाच्या शूटिंगवेळी दिव्या आणि भूषण यांची ओळख झाली होती. दिव्याला बघताच भूषण तिच्या प्रेमात पडले होते. भूषण यांची टीसीरिज कंपनी आहे हे दिव्याला माहित होते म्हणून तिने सुरुवातीला फार ओळख वाढवली नाही. मात्र भूषण यांनी दिव्याचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी बहिणीच्या लग्नाचं तिला आमंत्रण दिलं. तिथे दिव्याच्या कुटुंबाशीही त्यांची ओळख झाली. दिव्याच्या कुटुंबाला भूषण पसंत पडले कारण इतके प्रसिद्ध असूनही ते खूपच साधे होते. दिव्याच्या आईने तिला लग्नासाठी मनवलं.तोपर्यंत तिलाही भूषण आवडायला लागले होते. अखेर 2005 साली दोघंही लग्नबंधनात अडकले. 

टॅग्स :दिव्या कुमारभुषण कुमारघटस्फोटलग्नबॉलिवूड