Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिव्या खोसलाने नावातून काढलं 'कुमार', नवऱ्यासोबतच्या नात्यात आला दुरावा? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 10:26 IST

दिव्या खोसला आणि भूषण कुमार यांच्यात बिनसलं?

बॉलिवूड निर्माते, टीसीरिजचे संचालक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांची पत्नी दिव्या खोसला (Divya Khosla)ही देखील अभिनेत्री आहे. दिव्याने टीसीरिजच्या (Tseries) अंतर्गत अनेक सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 2005 साली भूषण कुमार आणि दिव्या खोसला लग्नबंधनात अडकले. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र आता दोघांच्या नात्यात कटुता आल्याच्या चर्चा आहेत. कारण दिव्याने सोशल मीडियावरुन नावापुढील कुमार हटवलं आहे. इतकंच नाही तर तिने 'टीसीरिज'ला अनफॉलोही केलं आहे.

भूषण कुमार आणि दिव्या खोसला यांचा १९ वर्षांचा संसार आहे. दोघंही एकमेकांसोबत नेहमीच आनंदात दिसले आहेत. दिव्याच्या करिअरमध्ये भूषण कुमार यांनी तिला बराच पाठिंबा दिला. मात्र आता पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये आणखी एक घटस्फोट होतो का अशी शक्यता आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर युझर्सने दिव्याची फॉलोइंग लिस्टही शेअर केली. यामध्ये तिने भूषण कुमार यांची प्रोडक्शन कंपनी Tseries ला अनफॉलो केलं आहे. तसंच तिने नावापुढील कुमार का हटवलं असे प्रश्नही नेटकऱ्यांना पडले आहेत. अद्याप याबद्दल अधिकृत समोर आलेली नाही. मात्र दोघांमध्ये दुरावा आल्याचं गॉसिप बीटाऊनमध्ये सुरु झालं आहे.

एका मुलाखतीत दिव्या म्हणाली होती की ती कधीच कामासाठी भूषण यांची मदत मागत नाही. "मी कधीच कामासाठी माझ्या पतीवर अवलंबून राहत नाही. जेव्हा मी यारियां सिनेमा बनवला तेव्हा त्यांनी स्क्रीप्टही ऐकली नव्हती. जेव्हा सिनेमा हिट झाला तेव्हा त्यांना हा विश्वास बसला की मी दिग्दर्शन करु शकते. त्यांनी मला कायम पाठिंबा दिला आहे पण मी त्यांच्यावर कधीच अवलंबून नसते. आपल्या पार्टनरला त्यांची स्पेस दिली पाहिजे या मताची मी आहे."

गेल्या काही वर्षांपूर्वी भूषण कुमार यांच्यावर एका महिलेने 'मी टू'मोहिमेवेळी गंभीर आरोप लावले होते. तेव्हा दिव्याने पतीची साथ दिली होती. ती म्हणाली होती की, "माझ्या पतीने आज टीसीरिजला ज्या उंचीवर नेलं आहे त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. लोकं तर श्रीकृष्णाच्याही विरोधात उभे होते. मला मान्य आहे की मी टू मोहिम समाजातील वाईट लोकांचा खरा चेहरा समोर आणत आहे मात्र काही लोक याचा गैरवापर करत आहेत. मी नेहमीच माझ्या पतीसोबत उभी आहे. लोक काहीही पुरावे नसताना कोणावरही कसेही आरोप लावतात हे खूप चुकीचं आहे."

टॅग्स :दिव्या कुमारभुषण कुमारबॉलिवूडलग्नघटस्फोट