Join us

कंगनाच्या आवाजाची दिलजीत दोसांजने उडवली खिल्ली, कंगनानेही उलट साधला निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 16:03 IST

दिलजीतने कंगनाच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. तर कंगनाने दिलजीत आणि प्रियांका चोप्राचं नाव घेऊन निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्यावरून गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. यादरम्यान आंदोलनाच्या समर्थनात आणि विरोधात गेल्या काही दिवसांपासून दिलजीत दोसांज आणि कंगना रणौतही सोशल मीडियावर आपसात भिडले. काही दिवसांपासून दोघेही एकमेंकार शेरेबाजी करत आहेत. आता पुन्हा एकदा दोघे आपसात भिडले आहेत. दिलजीतने कंगनाच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. तर कंगनाने दिलजीत आणि प्रियांका चोप्राचं नाव घेऊन निशाणा साधला आहे.

दिलजीत दोसांजने आपल्या लेटेस्ट ट्विटमध्ये एक ऑडिओ शेअर केलाय ज्यात तो कंगनाच्या आवाजाची मिमिक्री करत तिची खिल्ली उडवतो. या ऑडीओमध्ये दिलजीत म्हणाला की, कंगनाला दिवसातून एकदा त्याचं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही. त्याने स्वत:च्या नावाची तुलना डॉक्टरच्या औषधासोबत केली आहे. 

दिलजीतने हा ऑडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच कंगनाने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कंगना रणौतने थेट दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्राचं नाव घेत म्हणत आहे की, त्यांनी शेतकऱ्यांना भडकवलं आहे. 

दरम्यान कंगना-दिलजीतचं ट्विटर वॉर २७ नोव्हेंबरला सुरू झालं होतं. तेव्हा कंगनाने शेतकरी आंदोलनात सामिल झालेल्या एका वयोवृद्ध महिलेविरोधात अपमानजनक वक्तव्य केलं होतं. पण नंतर कंगनाने ट्विट डिलीट केलं होतं. मात्र, जेव्हा दिलजीतने यावरून कंगनावर टीका केली तेव्हापासून दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झालं होतं. केवळ दिलजीतच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कंगनावर तिच्या भाषेसाठी टीका केली होती.  

टॅग्स :दिलजीत दोसांझकंगना राणौतबॉलिवूडसोशल मीडिया