Join us

'नायक' सिनेमाचा सीक्वल येणार? अनिल कपूर दिली मोठी हिंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:15 IST

अनिल कपूर यांच्या 'नायक' चित्रपटाचा सिक्वल येणार अशी चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.  नुकतंच त्यांचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 'अ‍ॅनिमल'नंतर आता अनिल कपूर यांच्या 'नायक' चित्रपटाचा सिक्वल येणार अशी चर्चा रंगली आहे. या सिनेमासंदर्भात एक मोठे अपडेट आले आहे. 

अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर बॉबी देओलसोबतचा एक शर्टलेस फोटो पोस्ट केला होता. यावर चाहत्यांनी कमेंट केल्या. एका चाहत्याने कमेंटमध्ये अनिल कपूर यांना 'नायक 2' बनवण्याची विनंती केली. यावर अनिल कपूरनेही प्रतिक्रिया देत लवकरच चित्रपट बनवणार असल्याचे सांगितले. 

'नायक' हा सिनेमा 2001 साली प्रदर्शित झाला होता. नायकमध्ये अनिल कपूर यांनी एका वृत्तनिवेदकाची भूमिका केली होती. ज्याला एका दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. या सिनेमात भष्ट्राचार, गुन्हेगारीवर भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते 'नाईट मॅनेजर' सिरीजमध्येही दिसले होते.  यामध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. तर त्यांचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय अनिल कपूर हे 'फायटर' या सिनेमात दिसणार आहेत. या वयातही ते ज्या पद्धतीने सक्रिय आहे, हे पाहून इतर कलाकारही चकित होत आहेत.  

टॅग्स :अनिल कपूरसिनेमाबॉलिवूड