Join us

"कधी सुटका होईल...?" धर्मेंद्र यांच्या नवीन पोस्टमुळे चर्चांना उधाण, काय म्हणाले दिग्गज अभिनेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:10 IST

धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर केलेल्या नवीन पोस्टची सध्या चर्चा आहे (dharmendra)

धर्मेंद्र (dharmendra) हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते. धर्मेंद्र गेली अनेक दशकं बॉलिवूडमध्ये सक्रीय आहेत. धर्मेंद्र सोशल मीडियावरही सक्रीय असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतात. अशातच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. काय म्हणाले धर्मेंद्र बघाधर्मेंद्र यांची क्रिप्टिक पोस्टधर्मेंद्र यांचे वय ८९ वर्ष आहे. धर्मेंद्र वाढत्या वयानुसार नातेसंबंधांवर आणि नात्यांमध्ये होत असलेल्या गैरसमजाबद्दल पोस्ट शेअर करत असतात. धर्मेंद्र यांनी नुकतीच अशीच एक पोस्ट केली आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे. धर्मेंद्र लिहितात की, "'दूरियां दिलों में बढ़ती ही जा रही हैं...कब मिलेगा छुटकारा...इन गलतफहमियों से।" अशी पोस्ट लिहिलीय. धर्मेंंद्र यांच्या पोस्टने चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. 

धर्मेंद्र यांंचं वर्कफ्रंटधर्मेंद्र यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२३ मध्ये आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात धर्मेंद्र यांनी अभिनय केला होता. या सिनेमातील धर्मेंद्र आणि शबानी आझमी यांच्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली. याशिवाय २०२४ मध्ये आलेल्या 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' या सिनेमात धर्मेंद्र यांनी शाहिद कपूरच्या आजोबांची भूमिका साकारलेली. धर्मेंद्र यांच्या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.

टॅग्स :धमेंद्रइन्स्टाग्रामसोशल मीडियाबॉलिवूड