Join us

वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच धनुषने एक्स वाइफ ऐश्वर्याबाबत केलं ट्विट, तिनेही दिला रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 18:21 IST

धनुष (Dhanush) आणइ ऐश्वर्या (Aishwarya) एकमेकांपासन वेगळे झाल्यानंतर आपल्या कामांवर फोकस करत आहेत. ऐश्वर्याचं गाणं 'पयानी' (Payani) रिलीज झालं होत आहे.

सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याने (Aishwaryaa Rajnikanth) काही दिवसांपूर्वी पती धनुषपासून (Dhanush) वेगळं होण्याची घोषणा केली होती. दोघेही वेगळे झाल्याने फॅन्सना धक्का बसला होता. १८ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. असं असलं तरी त्यांचं नातं आजही मैत्रीचं आहे. धनुष पत्नीबाबत एक ट्विट केलं असून त्याची चर्चा होत आहे.

धनुष (Dhanush) आणइ ऐश्वर्या (Aishwarya) एकमेकांपासन वेगळे झाल्यानंतर आपल्या कामांवर फोकस करत आहेत. ऐश्वर्याचं गाणं 'पयानी' (Payani) रिलीज झालं होत आहे. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनुषने ट्विट करत लिहिलं की, 'पयानी' गाण्यासाठी तुला खूप शुभेच्छा ऐश्वर्या माझी मैत्रीण'. धनुषने ऐश्वर्याला आपली मैत्रीण म्हटलं. धनुषच्या ट्विटवर ऐश्वर्याने प्रतिक्रियाही दिली आहे. तिने ट्विटला उत्तर देत त्याला धन्यवाद दिले आहे.

दरम्यान धनुषने यावर्षी जानेवारीमध्ये ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत पत्नी ऐश्वर्यापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. ज्यात त्याने लिहिलं होतं की, '१८ वर्ष आम्ही सोबत होतो. आम्ही मित्र, कपल आणि पॅरेंट्स बनून सोबत राहिलो. या प्रवासात आम्ही खूप काही पाहिलं. आज आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी एक कपल म्हणून वेगळे होत आहोत. प्लीज आमच्या निर्णयाचा सन्मान करा आणि आम्हाला प्रायव्हसी द्या. हीच पोस्ट ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

धनुषने जेव्हा ऐश्वर्यासोबत लग्न केलं तेव्हा तो केवळ २१ वर्षांचा होता तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती. दोघांचंही लग्न तमिळ रितीरिजावानुसार झालं होतं. दोघांना दोन मुलं आहेत. एकाचं नाव राजा आहे तर दुसऱ्याचं लिंगा राजा.

मीडिया रिपोर्टनुसार धनुष आणि ऐश्वर्याची भेट Kadhal Kondaen सिनेमा दरम्यान झाली होती. सिनेमा थिएटरच्या मालकाने ऐश्वर्याची भेट धनुषसोबत करून दिली होती. तेव्हा तिने त्याच्या कामाचं कौतुक केलं होतं. त्यानंतर तिने त्याच्या बुकेही पाठवला होता. नंतर ते मित्र झाले आणि मग हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. दोघांनी १८ नोव्हेंबर २००४ मध्ये लग्न केलं होतं.

टॅग्स :धनुषबॉलिवूडTollywoodसोशल मीडिया