Join us

हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 17:11 IST

Deepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनेता प्रभाससोबत हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिची अचानक तब्येत बिघडली.

Deepika Paduone : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिची तब्येत बिघडली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या ती हैदराबादमध्ये अभिनेता प्रभाससोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

हृदयाचे ठोके वाढल्यानंतर रुग्णालयात नेलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणला हृदयाचे ठोके वाढण्याची तक्रार होऊ लागली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची हैदराबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. आता ती हॉटेलमध्ये आराम करत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे बोलले जात आहे.

दीपिका शूटिंगला परतली ?साऊथ चित्रपटाच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवणाऱ्या मनोबाला विजयबालन यांनी ट्विटरवरुन सांगितले की, दीपिका आता पूर्णपणे बरी असून चित्रपटाच्या शूटिंगला परतली आहे. आतापर्यंत दीपिका किंवा दीपिकाच्या पीआर टीमने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका सध्या आराम करत आहे.

दीपिकाचे आगामी सिनेमे दीपिका आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. प्रोजेक्ट केमध्ये ती प्रभाससोबत, फायटरमध्ये हृतिक रोशन आणि पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच हृतिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तिने याआधी शाहरुख खानसोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख आणि दीपिकाचा हा चौथा चित्रपट असेल.

टॅग्स :दीपिका पादुकोणहैदराबादबॉलिवूडप्रभास