Join us

कंगना रनौतविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका, असे आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 07:08 IST

चित्रपट दिग्दर्शक मुन्नावरअली ऊर्फ साहिल अश्रफअली सय्यद यांच्याच तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना व रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात याला आव्हान दिले.

मुंबई :न्यायालयात दिलेल्या आश्वासनाचे पालन न केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर न्यायालय अवमान कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका चित्रपट दिग्दर्शक मुन्नावरअली यांनी सोमवारी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.चित्रपट दिग्दर्शक मुन्नावरअली ऊर्फ साहिल अश्रफअली सय्यद यांच्याच तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना व रंगोलीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने उच्च न्यायालयात याला आव्हान दिले. या सुनावणीवेळी कंगनाने आपण या गुन्ह्याच्या पोलीस तपासासंबंधी समाजमाध्यमांवर काहीही भाष्य करणार नाही, अशी हमी उच्च न्यायालयाला दिली होती. मात्र, ८ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदविल्यावर तिने एक व्हिडीओ ट्विटरद्वारे प्रसिद्ध केला आहे. त्यात तिने पोलीस आपली छळवणूक करत आहेत, असे म्हटले आहे.

टॅग्स :कंगना राणौतन्यायालयउच्च न्यायालयबॉलिवूडपोलिस