Join us

'छावा' पाहिल्यावर भारावून गेला करण जोहर, म्हणाला- "अक्षय खन्नाने.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:04 IST

'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर करण जोहर भारावून गेला आहे. त्याने या सिनेमाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांचं कौतुकही केलं आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. सगळीकडे 'छावा' सिनेमा आणि विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरनेही 'छावा' सिनेमा पाहिला. 'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर करण जोहर भारावून गेला आहे. त्याने या सिनेमाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांचं कौतुकही केलं आहे. 

करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन 'छावा' सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने विकी कौशल आणि अक्षय खन्नाचं कौतुक केलं आहे. "छावा या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी सर्वात आधी बधाई हो. क्लायमॅक्स हा न संपणारा आणि दृश्यांनी भावनिक करणारा आहे. विकी कौशल हा अत्यंत हुशार अभिनेता आहे. प्रत्येक सीनचा तो आत्मा आहे. अक्षय खन्नाचा अभिनय जरब बसवणारा आहे. डिन्नो, लक्ष्मण आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन", असं करण जोहरने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, 'छावा' सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका निभावली आहे. अनेक मराठी कलाकार या सिनेमात झळकले आहेत. 

टॅग्स :'छावा' चित्रपटकरण जोहरविकी कौशल