Join us

शरीर सुखाची मागणी, पीडितेचा नकार; कास्टिंग डायरेक्टरने १८ वर्षीय मुलीचं डोकंच फोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 09:12 IST

मायानगरीतील धक्कादायक घटना.

मायानगरीत कधी काय होईल सांगता येत नाही. एकमेकांच्या फायद्यासाठी कोणीही कोणत्याही थराला जाऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. २६ वर्षीय कास्टिंग डायरेक्टर दीपक मालाकरची फेसबुकवर एका मुलीशी ओळख झाली. दीपकने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता त्याने तिच्यावर बलात्कार आणि नंतर हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

ही घटना मुंबईतील वर्सोवा भागातील आहे. दीपक मालाकर कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतो. फेसबुकवर त्याची एका १८ वर्षांच्या मुलीशी मैत्री झाली. १० ऑगस्टला दोघांची भेट झाली. दीपक रात्री साडेदहा वाजता पीडित मुलीला वर्सोवा येथील गोमा गल्ली येथील नखवा हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथे माझा मित्र राहतो त्याच्याकडून सामान घ्यायचे आहे असं सांगून तो पीडितेला घेऊन गेला. 

फ्लॅटवर पोहोचताच दीपकने गेट बंद केले आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार दिला असता तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. तिला गंभीर दुखापत झाली. दीपकने पीडितेच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडिता बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाल्याचं दीपकला वाटलं आणि त्याने तिथून पळ काढला. ११ ऑगस्ट रोजी पीडितेला शुद्ध आली आणि तिने ओरडायला सुरुवात केली. फ्लॅटच्या जवळपास राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना सूचना केली. पोलिसांना समजताच ते तिथे दाखल झाले, तिला बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं.

पोलिस आरोपीच्या शोधात होती. दीपकतने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता. तीन दिवस तपास केल्यानंतर दीपकला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं . त्याची चौकशी केली असता त्याने आरोप कबूल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेची तब्येत गंभीर असल्याने तिच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. आरोपीने आरोप मान्य केले आहेत. त्याला पीडितेची हत्या करायची होती. कारण तिने शरीरसुखाला नकार दिला. आरोपीचं पूर्ण नाव दीपक जितेंद्र मालाकार आहे. त्याच्या विरोधात कलम 307,354, 354(अ),342,504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीबॉलिवूडपोलिस