Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अंत्यसंस्काराला जाण्यासाठीही कलाकार घेतात पैसे'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केला गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 08:22 IST

Anuj Sawhney: 'टॉम डिक एंड हॅरी' फेम अभिनेत्याने केला मोठा खुलासा

बॉलिवूड कलाकार कायम सोशल मीडियावर विविध कारणांसाठी चर्चेत येत असतात. यात कधी त्यांच्या सिनेमाची, कधी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलची चर्चा होत असते. परंतु, सध्या बॉलिवूड कलाकार एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. इंडस्ट्रीतील ही कलाकार मंडळी सिनेमा, जाहिराती, ब्रँड प्रमोशन वा अन्य अनेक माध्यमातून पैसे कमवत असतात. यात बऱ्याचदा ते एखाद्या लग्नसोहळ्यासाठी वा पार्टीमध्ये जाण्यासाठीही मानधन घेतात हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, एका अभिनेत्याने इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे. काही कलाकार मंडळी एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार विधीमध्ये सहभागी होण्यासाठीही पैसे घेत असल्याचं खुलासा या अभिनेत्याने केला आहे.

The Big Small Talk या पॉडकास्टमध्ये अभिनेता अनुज सोहनी (Anuj Sawhney) याने बॉलिवूडविषयी एक मोठा खुलासा केला आहे. इंडस्ट्रीतील मोठे स्टार्स फक्त लग्नकार्यासाठी नाही तर अंतिम संस्कार आणि तेराव्याला जाण्यासाठीही पैसे घेतात, असा खुलासा त्याने केला आहे.

नेमकं काय म्हणाला अनुज?

"हे जे मोठे स्टार्स असतात ना त्यांची कमाई तर लग्नकार्य वा एखाद्या कार्यक्रमातून होतच असते. पण, हे कलाकार अंतिम संस्काराला जाण्यासाठी आणि तेराव्याला जाण्यासाठीही पैसे घेतात", असं अनुज म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "अनेक जणांना या गोष्टीची माहिती नसेल किंवा कुणी या सगळ्याचा विचारही केला नसेल. पण, अंतिम संस्कार किंवा तेराव्याला जाण्यासाठीच्या त्यांच्य किंमतीही ठरलेल्या असतात."

दरम्यान, अनुजने २००३ मध्ये नई पडोसन या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. तो 'फंटूश', 'लाइफ में कभी कभी' ,'चिंगारी', 'टॉम डिक एंड हॅरी' यांसारख्या सिनेमात झळकला आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन