Join us

बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:29 IST

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेलं सार्वजनिकरित्या लग्न, पण आता वेगळंच गुपित आलं समोर

प्रसिद्धी गायक अरमान मलिकने (Armaan Malik)  गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात लाँग टाईम गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत लग्नगाठ बांधली होती. महाबळेश्वर येथील सुंदर ठिकाणी दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आतापर्यंत सर्वांना हेच वाटत होतं. मात्र या कपलने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच सिग्नेचर मॅरेज केलं होतं. हे आता चाहत्यांच्या समोर आल्याने सर्वांना सुखद धक्काच बसला आहे. दोघंही सिग्नेचर मॅरेजची आज पहिली अॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत. यासोबतच त्यांचे या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

अरमान मलिक आणि आशना श्रॉफने २२ एप्रिल २०२४ रोजीच लग्न केलं होतं. त्याचे फोटो आता कपलने शेअर केले आहेत. यासोबत आशनाने कॅप्शनमध्ये लिहिले, "डिसेंबरमध्ये झालेला आमचा लग्न समारंभ हाच आमचा खरा लग्न समारंभ असेल हे आम्हाला नेहमीच माहित होते, पण प्रत्यक्षात हा दिवस आमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त अर्थपूर्ण होता.

मी ६३ वर्षांपूर्वीची माझ्या आजीची लग्नातील साडी घातली होती, यासोबत मी माझ्या पणजीचे दागिने घातले होते. (हिरव्या बांगड्या माझ्या महाराष्ट्रीय वंशाच्या लोकांकडून त्यांच्या सन्मानार्थ होत्या). आईने मला साडी नेसवली. माझ्या बेस्ट फ्रेंडने हेअरस्टाईल केली. लग्नाच्या  गोंधळात मी जे काही मिळेल ते वापरून माझा मेकअप केला. अरमानने माझ्या एन्ट्रीला माझं आवडतं "ये तुने क्या किया" गाणं लावलं आणि २२.०४.२०२४ रोजी सकाळी ११:११ वाजता आम्ही आमच्या पहिल्या घरात कायदेशीररित्या लग्न केलं. नंतर कुटुंबासोबत वेळ घालवला. खूप हसलो, भरपेट जेवलो आणि सर्व काही अनुभवत होतो. त्यानंतर आम्ही दोघांनी आमच्यासाठी कॉकटेल बनवले आणि पती पत्नी म्हणून दोघांनी आमच्या नवीन घराच्या बाल्कनीतून सूर्यास्त पाहिला."

टॅग्स :अरमान मलिकबॉलिवूडसंगीतलग्नसोशल मीडिया