Join us

'या' एका कारणामुळे 'हम साथ साथ हैं' फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री; 19 वर्षानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 19:00 IST

Neelam kothari: नीलमने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधून काढता पाय का घेतला यामागचं कारण सांगितलं.

सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडचा 80 ते 90 चा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे नीलम कोठारी (Neelam Kothari). असंख्य सुपरहिट सिनेमा देणाऱ्या नीलमने करिअरच्या टॉपवर असतांना अचानक इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला. आज ती कलाविश्वात जरी सक्रीय नसली तरी सुद्धा सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे. मात्र, यश, प्रसिद्धी सारं काही उपभोगत असताना तिने इंडस्ट्रीतून काढता पाय का घेतला? हा प्रश्न आजही अनेकांना पडतो.या प्रश्नाचं उत्तर तिनेच एका मुलाखतीमध्ये दिलं आहे.

अलिकडेच नीलमने ANI ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने बॉलिवूडमधून काढता पाय का घेतला यामागचं कारण सांगितलं. तसंच ती सध्या काय करते हे सुद्धा तिने सांगितलं.

"मी ८०-९० च्या काळात इंडस्ट्रीची होणारी मोठी सुरुवात पाहिली. त्यानंतर मी इंडस्ट्री सोडली आणि स्वत:चा बिझनेस सुरु केला. त्यानंतर कित्येक वर्षांनी मी फॅब्युलेस लाइव्सच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सगळ्या विषयी मी एवढंच सांगेन की, माझा प्रवास एका रोलर कोस्टरसारखा होता. जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मला वाटलं की माझं शेल्फ लाइफ संपत आलंय त्यामुळे मी इंडस्ट्री सोडायचा निर्णय घेतला", असं नीलम म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्यावेळी मी वयाची ५० शी गाठली त्यावेळी मी निश्चिंत झाले. कारण, मी ऑफिसला जायचे आणि घरी यायचे. मी एक पत्नी,  आई या जबाबदाऱ्याही नीट पार पाडत होते. त्यानंतर मी पुन्हा एकदा धमाकेदार एन्ट्री केली. पण, यातून एवढं नक्की कळलं की वय हा फक्त आकडा आहे."

दरम्यान, नीलमने तिच्या करिअरमध्ये इल्जाम, खुदगर्ज, हत्या, ताकतवर, हम साथ साथ है, कुछ कुछ होता हैं यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं. नीलमने २००० साली बिझनेसमन ऋषी सेठियासोबत लग्नगाठ बांधली. परंतु, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर नीलमने २०११ मध्ये लोकप्रिय अभिनेता समीर सोनी सोबत दुसरं लग्न केलं. या जोडीने अहाना या मुलीला दत्तकही घेतलं आहे.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीटिव्ही कलाकार