Join us

मलायका अरोराचे वडील रुग्णालयात दाखल; अभिनेत्रीचा हॉस्पिटलबाहेरचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 19:28 IST

Malaika arora: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि तिची आई टेन्शनमध्ये असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora)  हिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर मलायका आणि तिच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघी रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मलायकाचे वडील अनिल अरोरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, त्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मलायका आणि तिची आई जॉयस यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आज (६ जुलै) मलायका तिच्या आईसोबत वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. परंतु, तिच्या वडिलांना नेमकं काय झालं आहे? त्यांच्यावर कसले उपचार सुरु आहेत या मागचं कारण समोर आलेलं नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि तिची आई टेन्शनमध्ये असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मलायकाची ही अवस्था पाहिल्यावर अनेकांनी तिचे वडील बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

दरम्यान,  मलायकाचे वडील अनिल अरोरा आणि आई जॉयस पॉलीकार्प यांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मलायका आणि अमृता या दोघी बहिणी त्यांच्या आईसोबत राहतात. एका मुलाखतीमध्ये मलायकाने आई-वडिलांच्या घटस्फोटावर भाष्य केलं होतं. ती ११ वर्षांची होती तेव्हाच तिचे आई-वडील विभक्त झाले.   

टॅग्स :मलायका अरोराबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा