Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री हंसिका मोटवानीची स्वप्नपूर्ती! खरेदी केलं नवं घर ; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:42 IST

अभिनेत्री हंसिका मोटवानी सोशल मीडियाद्वारे नवीन घर खरेदी केल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे.

Hansika Motwani : अभिनेत्री हंसिका मोटवानीने(Hansika Motwani) बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.छोट्या पडद्यावरील ‘शाकालका बुम बुम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलेल्या हंसिकाने ‘कोई मिल गया’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर हंसिका अनेक चित्रपटांत झळकली. अभिनयातील करिअरप्रमाणेच ती वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिने नवीन घर खरेदी केल्याची माहिती चाहत्यांनी दिली.

हंसिकाने सोशल मीडियावर नवं घर खरेदी केल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. नुकताच हंसिकाने नव्या घरात प्रवेश केला आहे. अभिनेत्रीने पती सोहेल खतुरियासोबत गृहप्रवेश करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. डोक्यावर कलश शिवाय रितीरिवाजानूसार तिने गृहप्रवेश केलाय. "नवीन सुरूवात..." असं म्हणत हंसिकाने इन्स्टाग्रामवर गृहप्रवेशाचे फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळतंय. हंसिका मोटवानीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने संपूर्ण घराची झलक दाखली आहे. या आनंदाच्या प्रसंगी अभिनेत्री हिरव्या रंगाची रेशमी साडी परिधान केली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. तर अभिनेत्रीचा नवरा सोहेल खतुरिया फिकट आकाशी रंगाच्या शेरवीनीमध्ये दिसत आहे. फोटोंमध्ये दोघेही पारंपरिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. 

टॅग्स :हंसिका मोटवानीबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया