Join us

हातात हातोडा अन् धास्तावलेला चेहरा; आलियाच्या 'जिगरा'ची पहिली झलक समोर, या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 17:05 IST

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

Alia Bhatt Jigra Movie Frist Look: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. आलियाने तिचा आगामी चित्रपट 'जिगरा'ची पोस्टर इमेज इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहाणी' या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरसोबत अभिनेत्री पुन्हा काम करताना दिसणार आहे. तर वासन बाला हे  या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. दरम्यान, या चित्रपटातील आलियाचा फर्स्ट लूक देखील समोर आला आहे.

'जिगरा' या  अ‍ॅक्शनपटामध्ये  आलिया धमाकेदार स्टंट करताना दिसणार आहे. आपल्या भावाच्या रक्षणासाठी एक तरुणी काहीही करायला तयार असते, असं या चित्रपटाचं कथानक आहे. नुकतीच या सिनेमाची पोस्टर इमेज समोर आली आहे.  आलिया भट्टने 'जिगरा'चे  दोन पोस्टर इमेज सोशल मीडियावर शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या पोस्टरमध्ये 'द आर्चिज फेम' अभिनेता वेदांग रैना दिसतोय आणि त्यात आलिया भट्ट देखील उभी आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये आलियाच्या दोन्ही हातात हत्यारे दिसत आहेत, तर आजूबाजूला सर्वत्र आग लागल्याचं चित्र आहे.  येत्या ११ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अभिनेत्रीने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "तू मेरी प्रोटेक्शन में है", म्हणजेच मी तुझं रक्षण करणार आहे. तर दुसऱ्या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये "कहानी बहुत लंबी है और भाई के पास वक्त बहुत कम हैं" असं म्हटलंय. 

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटीसोशल मीडियासोशल व्हायरल