Join us

Video: 'छावा'च्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशलने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन केला अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 15:39 IST

अभिनेता विकी कौशलने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, पाहा व्हिडीओ.

Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) यांची  प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मांडणारा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. अशातच चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचा पाहायला मिळतोय.

छावा सिनेमाच्या प्रमोशनसाठी सध्या विकी कौशल संभाजीनगर येथे पोहोचला आहे. या शुभकार्याची सुरुवात अभिनेत्याने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. यावेळी विकी मंदिरात पूजा करण्यात मग्न असलेला दिसतो आहे. सोशल मीडियावर विकी कौशलचे व्हायरल होणारे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारीला 'छावा' हा सिनेमा जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता देखीस शिगेला पोहचली आहे. अभिनेता विकी कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :विकी कौशलरश्मिका मंदानाबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा