Join us

सोनू सूदने हातानेच साप पकडला अन् पोत्यात भरला, नंतर...;  व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 11:57 IST

हाताने साप पकडला, पोत्यात भरला अन्...; सोनू सूदने केलं असं काही, व्हिडीओची होतेय चर्चा

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood) हा त्याच्या अभिनयापेक्षा समाजकार्यासाठी ओळखला जातो. लॉकडाऊनमध्ये अभिनेत्याने अनेक गरजूंना मदत केल्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे. आपल्या दमदार अभिनयाने सोनू सूदने इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या हा अभिनेता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओने सगळ्यांचं मनं जिंकली आहेत.

नुकताच सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने चक्क हातामध्ये साप पकडला आहे. झालं असं की सोनू सूदच्या सोसायटीत साप शिरला होता. त्या सापाला हाताने पकडून सोनू सूदने पोत्यात भरलं आणि जीवनदान दिलं. शिवाय सोनू सूद त्याच्या गार्डला सापला जंगलात सोड असं सांगतो. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणतो की, "हा साप आमच्या सोसायटीत आला. हा एक रॅट स्नेक आहे. तो विषारी नाही. तुमच्या परिसरात किंवा सोसायटीत असा साप आढळला तर कृपया साप पकडणाऱ्या एक्सपर्ट्सना बोलवा. पण, काळजी घेणं गरजेचं आहे. मला साप पकडायची  टेक्निक माहित आहे, म्हणून मी त्याला पकडलं, पण काळजी घ्या." सोनू सूदच्या व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

"हर हर महादेव...", असं कॅप्शन देत अभिनेत्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दरम्यान, या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिलंय की, एक ही तो दिल है Boos कितनी बार जितोगे...", तर आणखी एका चाहत्याने म्हटलंय, "सर, तुम्ही ग्रेट आहात...".

लातूरच्या शेतकऱ्याला केली मदत

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती शिवारात पंचाहत्तरी गाठलेले अंबादास पवार  (Old Latur Farmer) यांनी स्वत:च औताला जुंपलं होतं. बैलजोडी घ्यायला परवडत नसल्याने शेतात कोळपणी करण्यासाठी स्वत:च नांगर ओढायला सुरुवात केली. त्यांच्या सोबत पत्नी मुक्ताबाई होत्या. या शेतकऱ्याचा व्हिडीओ (Latur Farmer Video) व्हायरल झाला आणि अनेकजण पुढे आले. यात 'रिअल लाईफ हिरो' म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद होता. सोनू सूदनंशेतकरी दाम्पत्यासाठी बैल पाठवायचं आश्वासन दिलं आणि ते पूर्ण देखील केलं. 

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया