Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजय देवगणनंतर दीपिकाला पाठिंबा देण्यासाठी सैफ पुढे सरसावला; ८ तासांच्या शिफ्टबद्दल म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 11:37 IST

दीपिका पादुकोणची 'स्पिरिट'मधून एक्झिट; 'त्या' वादावर सैफ अली खान भाष्य करत म्हणाला...

Saif Ali Khan :  सध्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यामधील वाद एक चर्चेचा विषय बनला आहे. बहुचर्चित 'स्पिरिट' या प्रोजेक्टसाठी दीपिकाने दिवसाला फक्त ८ तास काम करण्याची मागणी केली होती,त्यामुळे चित्रपटातून अभिनेत्राला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, असे अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. याचाच राग म्हणून की काय दीपिकाने 'स्पिरिट'ची स्क्रिप्टच लीक केल्याचा आरोप संदीप रेड्डी वांगा यांनी केला. दरम्यान, दीपिकाच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता अजय अभिनेता देवगणसह अनेकांनी पाठिंबा देत मत व्यक्त केलं होतं, त्यात आता अभिनेता सैफ अली खानने या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफ अली खान अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यादरम्यान, अभिनेता दीपिकाला पाठिंबा दर्शवत म्हणाला, "कुटुंब खूप महत्वाचं आहे. कारण, जेव्हा मी कामावरुन घरी येतो आणि तेव्हा जर मुले झोपली असतील तर ते पाहून वाईट वाटतं. मग हे तुमचं यश नाही. जेव्हा तुम्ही समोरच्याला नाही म्हणून तुमच्या कुटुंबाला प्राधान्य द्याल, हे तुमचं खरं यश आहे."

त्यानंतर पुढे अभिनेता कामाच्या वेळेबद्दल म्हणाला, "आम्हाला वर्षातून फक्त चार वेळा सुट्ट्या मिळतात. जेव्हा माझी मुले सुट्टीवर असतात तेव्हा मी काम करत नाही. कारण ती वेळ खूप महत्वाची आहे. सध्या मी वयाच्या त्या टप्प्यावर आहे. जिथे मला माझी आई आणि मुलांना वेळ देणं महत्वाचं वाटतं. आपल्याला या सर्वांसाठी काम करणं महत्त्वाचं आहेच, परंतु आपल्याला कुटुंबासोबत वेळ घालवणे देखील तितकच आवश्यक आहे. तुमचं खरं यश हेच आहे जेव्हा तुम्ही काम बाजूला सारुन आपल्या घरच्यांना वेळ देता."

दरम्यान, संदीप रेड्डी वांगा यांनी 'स्पिरीट' सिनेमात दीपिकाच्या जागी आता तृप्ती डिमरीची निवड केली आहे. या सिनेमासाठी तृप्ती १० कोटी घेणार आहे. तर दीपिकाने याच सिनेमासाठी तब्बल २० कोटी रुपये मानधनाची मागणी केली होती ज्याची खूप चर्चा झाली. 

टॅग्स :सैफ अली खान दीपिका पादुकोणबॉलिवूडसिनेमा