Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तनू वेड्स मनू- ३' मधून आर माधवनचा पत्ता कट? अभिनेता म्हणाला- "कदाचित मला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 13:00 IST

'तनू वेड्स मनू' हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

R Madhavan : अभिनेता आर माधवन (R Madhavan) आणि कंगना राणौत(Kangana Ranaut) यांची मुख्य भूमिका असलेला 'तनू वेड्स मनू' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 'तनू वेड्स मनु' ही बॉलिवूड सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फ्रॅंचाईजी पैकी एक आहे. चित्रपटाच्या पहिला भागाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर २०१५ मध्ये तनू वेड्स मनू चा सीक्वेलही आला. आता लवकरच ‘तनू वेड्स मनू’चा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आर माधवन याने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधलं आहे.

'द इंडियन एक्सप्रेस'च्या 'स्क्रीन शो'मध्ये अभिनेता आर माधवनने हजेरी लावली. यादरम्यान आर माधवनला तनू वेड्स मनू संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "मला याबद्दल कोणतीही कल्पना नाही. इन्स्टाग्रामवर सुद्धा यासंदर्भात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर मला लोक प्रश्न विचारत आहेत. पण, अद्यापही मला आनंद एल राय किंवा इतर कोणीही 'तनू वेड्स मनू' च्या तिसऱ्या पार्ट संदर्भात विचारणा केलेली नाही."

पुढे अभिनेता म्हणाला, "मला काहीच माहिती नाही शिवाय स्क्रीप्ट सुद्धा मला दिलेली नाही. कदाचित मला रिप्लेस करण्यात आलं असेल."

टॅग्स :आर.माधवनकंगना राणौतबॉलिवूडसिनेमा