Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भूल भुलैया' पाहून घाबरलेला अक्षय कुमारचा लेक, ६ वर्ष विद्या बालनशी बोलतच नव्हता, अभिनेत्याने सांगितलं काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 12:01 IST

'भूल भुलैया' बघितल्यानंतर अक्षय कुमारचा मुलगा ६ वर्ष विद्या बालनशी बोलत नव्हता, अभिनेता म्हणाला-"त्याला तिच्यात..."

Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासह चित्रपटांमुळे देखील तितकाच चर्चेत असत. अक्षय लवकरच एका हॉरर-कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'भूत बंगला' या त्याच्या आगामी चित्रपटातून अक्षय कुमार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून जवळपास १४ वर्षांनंतर अक्षय आणि प्रियदर्शन एकत्र काम करताना दिसणार आहेत.

अलिकडेच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान,  अक्षयने त्याचा हा चित्रपट 'भूल भुलैया'पेक्षा कसा वेगळा आहे,याबद्दल सांगितलं. तसंच त्याने  भूल भुलैया सिनेमाच्या काही आठवणी सांगितल्या. भूल भुलैया प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील मंजुलिका पाहिल्यानंतर तो प्रचंड घाबरला होता. यामुळे आरव तब्बल ६ वर्ष विद्या बालनसोबत बोलत नव्हता.

अक्षय कुमारने सांगितला 'भूल भुलैया' आणि 'भूत बंगला' मधील फरक 

यावेळी अक्षय कुमार पहिल्यांदा 'भूल भुलैया' आणि 'भूत बंगला' मधील फरक सांगत म्हणाला,"भूत बांगला हा एक हॉरर सिनेमा आहे.  तर भूल भुलैया हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा होता.भूल भुलैया पाहून सुरुवातीला असं वाटतं की त्या मुलीला भूताने झपाटलं आहे, पण नंतर असं समजतं की ही एक मानसिक समस्या आहे.'भूत बंगला'मध्ये 'वधुसुर' कोण आहे आणि तो असे का वागतो, हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय हा चित्रपट मुलांनाही पाहता यावा, यादृष्टीने आम्ही बनवला आहे."

यानंतर भूल भुलैया पाहिल्यानंतर मुलगा आरवची काय प्रतिक्रिया होती हे सांगताना अक्षय कुमार म्हणाला,"जेव्हा माझ्या मुलाने 'भूल भुलैया' पहिल्यांदा पाहिला, तेव्हा तो सहा वर्षे विद्या बालनला घाबरत होता. जेव्हा कधी ती आमच्या घरी यायची, तेव्हा तो तिला भेटायलाही नकार द्यायचा आणि तिच्या डोळ्यात बघायचा नाही.त्याला तिच्यात मंजुलिका दिसली.मग  मला त्याला समजावून सांगावं लागलं की ती मंजुलिका नसून विद्या आहे आणि ती खूप चांगली व्यक्ती आहे, पण त्याचा विश्वासच बसत नव्हता." असा मजेशीर किस्सा अभिनेत्याने सांगितला.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar's son feared Vidya Balan after watching 'Bhool Bhulaiyaa'.

Web Summary : Akshay Kumar revealed his son Aarav was scared of Vidya Balan for six years after watching her as Manjulika in 'Bhool Bhulaiyaa'. He also discussed the difference between 'Bhool Bhulaiyaa' and his upcoming horror-comedy film, 'Bhoot Bangla'.
टॅग्स :अक्षय कुमारविद्या बालनबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा