Akshay Kumar And Wamiqua Gabbi in Bhoot Bangla: विनोदी चित्रपटाच्या बाबतीत एकेकाळी हुकुमी एक्का म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा भूत बंगला या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात अक्षय कुमार आणि वामिका गब्बी ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. घाऱ्या डोळ्यांची आणि निखळ सौंदर्य असलेली वामिका सध्या सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर वामिकाच्या तुलना मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची स्टार नायिका ऐश्वर्या रायसोबत करण्यात येत आहे. आता अक्षय कुमारने यावर प्रतिक्रिया देत सहअभिनेत्री वामिका गब्बीला पाठिंबा देखील दिला आहे.
अलिकडेच शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमारला, वामिका आणि ऐश्वर्या राय यांच्यातील तुलनेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने यावर अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं. त्यावेळी अक्षय कुमार म्हणाला,"यात काही शंका नाही की, वामिकाचे डोळे ऐश्वर्या रायइतकेच सुंदर आणि आकर्षक आहेत. पण, आपण हे सुद्धा विसरता कामा नये की तिची स्वत:ची एक वेगळी ओळख आहे."
यापुढे अक्षय कुमार म्हणाला,"आज ती ज्या ठिकाणी आहे,तिथे पोहोचण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे.वामिकाने पंजाबी चित्रपटांपासून सुरुवात केली आणि आज तिने हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हे तिच्या मेहनतीचं फळ आहे."
प्रियदर्शन दिग्दर्शित 'भूत बंगला' या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार १४ वर्षांनंतर या दिग्दर्शकासोबत पुन्हा एकत्र काम करत आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटात राजपाल यादव, परेश रावल, जिस्सू सेनगुप्ता आणि तब्बू यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटालाबॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Web Summary : Akshay Kumar supports co-star Wamiqua Gabbi, acknowledging her beauty rivals Aishwarya Rai's, but emphasizes her unique identity and hard-earned success in multiple film industries with 'Bhoot Bangla'.
Web Summary : अक्षय कुमार ने वामिका गब्बी का समर्थन करते हुए कहा कि उनकी सुंदरता ऐश्वर्या राय से कम नहीं, पर वामिका की अपनी अलग पहचान है और उन्होंने कई फिल्म उद्योगों में सफलता प्राप्त की है।