Join us

बॉबी देओल-प्रिती झिंटाच्या 'सोल्जर' चा सीक्वेल येणार? शूटिंगबाबत अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 17:18 IST

1998 साली आलेला 'सोल्जर 2' हा सुपरहिट सिनेमा आठवतोय का?

अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) आणि प्रिती झिंटाचा(Preity Zinta) 'सोल्जर 2' (Soldier 2)  सुपरहिट सिनेमा आठवतोय का? 1998 साली हा सिनेमा आला आणि बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. सध्या सिनेमाच्या सीक्वेलची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी बॉबी देओलने एका सीक्वेलची हिंट दिली होती. रमेश तौरानी यांच्या एखाद्या सिनेमाचा सीक्वेल बनावा अशी त्याने इच्छा व्यक्त केली होती.

रमेश तौरानी यांनी नुकताच 'इश्क विश्क' चा सीक्वेल 'इश्क विश्क रिबाउंड' आणला. आता त्यांनी नुकतंच 'सोल्जर'च्या सीक्वेलचीही घोषणा केली आहे. 'सोल्जर' फ्रँचायजीबाबत त्यांनी आपला प्लॅन लवकरच पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "सोल्जरच्या सीक्वेलवर काम सुरु आहे. पुढच्या वर्षी सिनेमाचं शूट सुरु होईल. कथा काय असेल यावर कोणते कलाकार असणार हे अवलंबून आहे." 'इश्क विश्क रिबाऊंड'मध्ये शाहीद-अमृता नव्हते. त्यामुळे आता सोल्जर 2 मध्ये बॉबी आणि प्रिती झिंटाची भूमिका असेल की नाही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. 

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला होता की, "अॅनिमलच्या यशानंतर कदाचित रमेश तौरानी पार्ट २ चा विचार करत आहेत." 'अॅनिमल'च्या यशानंतर बॉबी देओलचा भाव वाढला आहे. तर प्रिती झिंटा सनी देओलसोबत 'लाहोर 1947' सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :बॉबी देओलप्रीती झिंटाबॉलिवूडसिनेमा