Join us

'गर्लफ्रेन्ड iPhone मागत आहे, काही होईल का?', सोनू सूदने दिला जबरदस्त रिप्लाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 13:52 IST

सोमवारी एका व्यक्तीने सोनूला टॅक करत एक विचित्र मागणी केली. त्याने सोनूला विचारले की, 'भाई, माझी प्रेयसी आयफोन मागत आहे. तिचं काही होऊ शकतं का? यावर सोनूने त्या व्यक्तीला मजेदार उत्तर दिलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेपासूनच अभिनेता सोनू सूद गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गेल्या दीड वर्षापासून तो लोकांची जमेल तशी मदत करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक त्याच्याकडे मदत मागतात आणि सोनूही शक्य ती मदत करण्याचा प्रयत्नही करतो. मात्र, सोमवारी एका व्यक्तीने सोनूला टॅक करत एक विचित्र मागणी केली. त्याने सोनूला विचारले की, 'भाई, माझी प्रेयसी आयफोन मागत आहे. तिचं काही होऊ शकतं का? यावर सोनूने त्या व्यक्तीला मजेदार उत्तर दिलं आहे.

२१ जूनची ही घटना आहे. सोनू सूदने एक ट्विट रि-ट्विट करत लिहिले की,  'आणखी काही सेवा असेल तर सांगा'. या ट्विटवरच एका व्यक्तीने लिहिले की, 'भाई, माझी गर्लफ्रेन्ड आयफोनची मागणी करत आहे. तिचं काही होऊ शकतं का?'.

यावर सोनू सूदने फारच मजेदार अंदाजात रिप्लाय केला. त्याने लिहिले की, 'तिचं तर माहीत नाही. पण आयफोन दिला तर तुझं काही राहणार नाही'. सोनूच्या या उत्तराला आतापर्यंत तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आणि दोनशे पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं.

सोनूच्या उत्तरावर त्या व्यक्तीने आणखी ट्विट केलं. त्याने रिप्लाय केला की, 'भाई सर्वांचं घर वसवतोय, माझं का तोडण्याच्या मागे लागलाय'. सोनूचं हे उत्तर वाचून त्याचे फॅन्स चांगलेच खूश झाले. या ट्विटवर लोक भरभरून कमेंट करू लागले. 

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडसोशल मीडिया