Join us

आर्यन खानच्या रुमर्ड गर्लफ्रेंडसमोर सुहानाही पडली फिकी, स्टारकीड्सचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 10:23 IST

आर्यनची गर्लफ्रेंड लारिसा आहे तरी कोण?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) चांगलाच चर्चेत असतो. क्रूझ ड्रग्स प्रकरणानंतर आर्यन खान प्रसिद्धीझोतात आला होता. काल रात्री आर्यन बहीण सुहानासोबत एका पार्टीत पोहोचला. मात्र या पार्टीत चर्चा झाली  ती आर्यनच्या गर्लफ्रेंडची. आर्यनच्या मागोमाग त्याची गर्लफ्रेंडही पार्टीत आली. तिच्या सौंदर्यापुढे सुहानाही फिकी पडली. आर्यनची गर्लफ्रेंड नक्की आहे तरी कोण?

आर्यन खान एका ब्राझिलियन मॉडेल लारिसा बोनेसीला (Larissa Bonesi) डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. काल रात्री आर्यन त्याच्या मित्रांसोबत पार्टीसाठी पोहोचला होता. यावेळी बहीण सुहाना खानही त्याच्यासोबत होती. ब्लॅक टीशर्ट, डेनिम जॅकेट, जीन्स आणि शूज असा त्याचा लूक होता. तर सुहाना थाय स्लीट वनपीसमध्ये खूपच बोल्ड दिसत होती. दोघांनी पापाराझींना पोज दिली आणि नंतर ते आतमध्ये गेले. 

तोच मागून आर्यनची गर्लफ्रेंड आली आणि तिने सगळं लाईमलाईट खेचून घेतलं. ब्लॅक बॅकलेस मिनी वनपीसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो दिसत होता. तिच्या सौंदर्यावर नेटकरी फिदा झाले आहेत.

कोण आहे लारिसा बोनेसी?

आर्यन खानच्या गर्लफ्रेंडचं नाव लारिसा बोनेसी आहे. ती आर्यनपेक्षा 8 वक्षांनी मोठी आहे. लारिसाने सिनेमांमध्ये कामही केलं आहे. ती गुरु रंधवाच्या 'सूरमा सूरमा' म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. स्टेबिन बेनच्या म्युझिक व्हिडिओमध्ये आणि विशाल मिश्रासोबतही ती झळकली आहे. तिने अक्षय कुमारच्या 'देसी बॉईज'मध्येही काम केले आहे. या चित्रपटात ती छोट्या भूमिकेत दिसली आहे.

टॅग्स :आर्यन खानसुहाना खानरिलेशनशिपबॉलिवूडसोशल मीडिया