Join us

36 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले 'राम-सीता', दीपिका चिखलिया यांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 20:23 IST

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेनंतर दीपिका चिखलिया आणि अरुण गोविल पुन्हा एकत्र आले आहेत.

रामानंद सागर यांची हिट टीव्ही मालिका 'रामायण' आजपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 36 वर्षांपूर्वी आलेल्या या मालिकेत अरुण गोविल यांनी भगवान रामची आणि दीपिका चिखलिया यांनी माता सीतेची भूमिका साकारली होती. तेव्हापासून आजपर्यंत खऱ्या आयुष्यातही लोक अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांना राम-सीता म्हणून ओळखतात. आता 36 वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करत आहे. 

ही जोडी एका चित्रपटात एकत्र काम करत आहे. दीपिका चिखलियाने चित्रपटाचा एक बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये या दोघांना पाहून चाहते आनंदी आहेत. या दोघांना पाहून चाहते जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले आहेत. या व्हिडिओवर अनेकजण प्रेमळ कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की, 'आम्ही तुम्हा दोघांना आजही सीता माता आणि राम जी मानतो. सीता आणि राम यांची नावे ऐकली की, तुमच्या दोघांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. 

तुमच्या हक्कांसाठी लढादीपिका चिखलियाने इंस्टाग्राम अकाउंटवर 'युनियन' चित्रपटाचा पडद्यामागचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, 'तुमच्या हक्कांसाठी लढा. बीटीएस युनियन फिल्म. व्हिडिओमध्ये लोकांचा एक गट विरोध करताना दिसत आहे. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया त्या ग्रुपचे नेतृत्व करत आहेत.

 

टॅग्स :रामायणबॉलिवूडइन्स्टाग्रामटेलिव्हिजन