Join us

एका सिनेमामुळे बदललं चहावाल्याचं नशीब; आज कमावतोय कोटयवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 13:11 IST

Bollywood actor: दोन वेळची भूक मिटवता यावी यासाठी त्याने अनेक लहानमोठी काम केलं. परंतु, या किरकोळ कामांमुळे त्यांच्या आर्थिक समस्या काही कमी होत नव्हत्या.

आयुष्यात कोणालाही संघर्ष चुकलेला नाही. आज अमाप संपत्ती उपभोगणारा व्यक्तीही संघर्ष करुनच या ठिकाणापर्यंत पोहोचला आहे. यात कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी २ वेळच्या जेवणासाठीही बराच स्ट्रगल केला आहे. यात सध्या अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्याने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी चहाची टपरी चालवली होती.

अनेक सुपरहिट बॉलिवूडसिनेमात झळकलेला अभिनेता म्हणजे अनु कपूर. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर अनु कपूरने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं. कधी नायक तर कधी खलनायक होत त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विशेष म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारा हा अभिनेता आज कोट्यवधींचा मालक आहे. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी तो चहाची टपरी चालवून घरखर्च चालवायचा. त्यामुळेच एक सामान्य चहावाला बॉलिवूड स्टार कसा झाला हे पाहु.

अनु कपूरने केली मोठा स्ट्रगल

दोन वेळची भूक मिटवता यावी यासाठी अनु कपूरने अनेक लहानमोठी काम केलं. सुरुवातीला ते चहाचा विकायचे. त्यानंतर लॉटरीचं तिकीट सुद्धा विकू लागले. पण, या किरकोळ कामांमुळे त्यांच्या आर्थिक समस्या काही कमी होत नव्हत्या.

नाटकामुळे बदललं नशीब

स्ट्रगल करत असलेल्या अनु कपूर यांचं नशीब एका नाटकामुळे बदललं. अनु कपूर यांनी एका नाटकामध्ये वयाच्या २३ व्या वर्षी चक्क ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं त्यावेळी प्रचंड कौतुक झालं होतं. विशेष म्हणजे त्यांचा अभिनय पाहून प्रसिद्ध फिल्ममेकर श्याम बेनेगलदेखील भारावून गेले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सिनेमात अनु यांना काम करायची संधी दिली.

छोट्या पडद्यामुळे मिळाली खरी ओळख

अनु कपूर यांनी मंडी या सिनेमात काम केलं. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती मालिकांमुळे. अनेक गाजलेल्या मालिका, टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर त्याचं नशीब बदलून गेलं. त्यांच्या प्रगतीचा आलेख हळूहळू करत वाढत गेला.

किती आहे अनु कपूरचं नेटवर्थ

अंताक्षरी या गाजलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करुन लोकप्रिय झालेल्या अनु कपूरने आजवर अनेक टीव्ही मालिका, सिनेमा, नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांचं नाव कायम कलाविश्वात आदराने घेतलं जातं. विशेष म्हणजे चहा टपरी चालवणारा हा अभिनेता आज १७० कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. तसंच त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आणि मुंबईत एक आलिशान घरदेखील असल्याचं सांगण्यात येतं. 

टॅग्स :अन्नू कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमानाटक