Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेने विचारला प्रश्न - माझा सोलमेट कुठंय?, फॅनच्या उत्तराने झाली अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 13:29 IST

अलिकडेच अंकिताने सोलमेटबाबत एक प्रश्न इन्स्टाग्रामवर विचारला होता. ज्याचं तिला फारच मजेदार उत्तर मिळालं.

हे सर्वांनाच माहीत आहे की, अंकिता लोखंडे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. आता ती विकी जैनसोबत कमिटेड रिलेशनमध्ये आहे. चर्चा तर अशीही आहे की, दोघे लवकरच लग्नही करणार आहेत. अशात अंकिता नेहमीच विकी जैनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अलिकडेच तिने सोलमेटबाबत एक प्रश्न इन्स्टाग्रामवर विचारला होता. ज्याचं तिला फारच मजेदार उत्तर मिळालं.

अंकिताने इन्स्टाग्रामवर स्टोरी क्विज खेळला. यात तिने प्रश्न विचारला की, माझा सोलमेट कुठे आहे? यावर तिला एका फॉलोअरचं उत्तर मिळालं. सोलमेटसारखी काही गोष्ट नसते. हे उत्तर वाचून अंकिताला हसू आवरलं नाही आणि तिने तिची हे रिअ‍ॅक्शन उत्तरासह इन्स्टावर पोस्ट केलीय.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एका पोस्टमध्ये अंकिताने विकी जैनला आपला सोलमेट सांगितलं होतं. तिने पोस्टमधून विकी जैन हा तिचा सुख-दु:खातील साथीदार म्हटलं होतं. सोबतच तिने त्याची माफीही मागितली होती की, तिच्यामुळे विकीला टीकेचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, अंकिताने काही दिवसांपूर्वीच एक डान्स प्रॅक्टिसचा व्हिडीओही शेअर केला होता. हा परफॉर्मन्स ती सुशांत सिंह राजपूतला ट्रिब्यूट म्हणून करणार आहे. एका अवॉर्ड शोमध्ये ती हा डान्स परफॉर्मन्स करणार आहे. या व्हिडीओचं तिच्या फॅन्सने बरंच कौतुक केलं होतं. 

टॅग्स :अंकिता लोखंडेसोशल मीडियाबॉलिवूडटेलिव्हिजन