Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा आजोबा झाल्यावर अनिल कपूर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले- "या गोंधळलेल्या जगात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:37 IST

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. सोनम आणि आनंदला मुलगा झाला आहे. ही गुड न्यूज शेअर करताना सोनमने सर्वांचे आभार मानले. सोनम ही प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी. अनिल कपूर यांनी लेक दुसऱ्यांदा आई झाल्यावर सोशल मीडियावर पोस्ट करुन आनंद व्यक्त केला आहे. काय म्हणाले अनिल?

अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन भावना व्यक्त करताना लिहिलं की, "आणि बघता बघता... माझं हृदय प्रेमाने अजूनच भरून आलंय. माझ्या बाळा, या जगात तुझं स्वागत आहे, तुझ्यावर आत्तापासूनच आम्हा सर्वांचं खूप प्रेम आहे. वायू, तू आता मोठा भाऊ झाला आहेस... आणि मला खात्री आहे की तू तुझी जबाबदारी उत्तम निभावशील. सोनम आणि आनंद, तुमचे खूप खूप आभार... नानाचं हृदय आज आनंदाने भरून गेलंय. बाळा, या गोंधळलेल्या पण सुंदर जगात तुझं स्वागत आहे. प्रेमाने भरलेल्या आयुष्यासाठी तुझं स्वागत."




अशी पोस्ट करुन अनिल कपूर यांनी त्यांच्या मनातील आनंद व्यक्त केलाय. अनिल कपूर कायमच लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. अनिल यांची ही पोस्ट वाचून दुसऱ्यांदा आजोबा होऊन अभिनेते किती खूश आहेत, याची जाणीव होते. सोनम कपूरचंबॉलिवूडमधलं करिअर कायमच चढ-उतारांनी भरलं आहे. परंतु लेकीच्या या करिअरमध्ये अनिल कपूर यांनी तिला कायमच आधार दिला आहे. आता दुसऱ्यांदा आजोबा झाल्याने अनिल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anil Kapoor overjoyed becoming grandfather again, welcomes the newborn.

Web Summary : Sonam Kapoor and Anand Ahuja welcomed their second child, a son. An elated Anil Kapoor expressed his joy, welcoming the baby to the world and praising Vayu for becoming a big brother. He thanked Sonam and Anand, his heart filled with happiness.
टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूरबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकारप्रेग्नंसी