Anil Kapoor Mother Passes Away: बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, संजय कपूर आणि बोनी कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे निधन झाले आहे. आज(2 मे 2025) रोजी निर्मल वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबात शोककळा पसरली आहे. निर्मल कपूर यांनी सप्टेंबर 2024 मध्ये आपला 90 वा वाढदिवस साजरा केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, निर्मल कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात काही काळ उपचार सुरू होते. आता त्यांच्या जाण्याने तीन मुलांसह संपूर्ण कपूर कुटुंब दुःखात आहे.
आम्हाला तुझी गरज आहे..निर्मल कपूर यांनी गेल्या वर्षी आपला 90 वा वाढदिवस साजरा केला, त्यावेळी कपूर कुटुंबात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बोनी कपूर यांनी त्यांच्या आईसाठी खास पोस्ट केली होती. त्यात त्यांनी लिहिले होते की, 'मम्मीजी, 90 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. शतक करण्यासाठी अजून फक्त एक दशक शिल्लक आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्ही इथे असणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, आमचे रक्षण करण्यासाठी आणि आमचे मार्गदर्शन करण्यासाठी.'
निर्मल कपूर यांनी 1955 मध्ये बॉलिवूडचे दिग्गज निर्माते सुरिंदर कपूर यांच्याशी लग्न केले. त्यांना चार मुले बोनी कपूर, अनिल कपूर, संजय कपूर आणि मुलगी रीना कपूर मारवाह आहेत. सुरिंदर कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये 'मिलेंगे मिलेंगे', 'लोफर', 'पोंगा पंडित', 'एक श्रीमान एक श्रीमती' यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. सप्टेंबर 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून बोनी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून करिअर केले. तर, अनिल कपूर आणि संजय कपूरने अभिनयाचे वाट निवडली.