Join us

'या' शहरात शिफ्ट झाली 'बिग बॉस' फेम आर्या जाधव, शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:52 IST

रॅपर आर्या जाधव सध्या चर्चेत आहे.

बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व चांगलेच गाजले. या शोमध्ये अमरावतीची रॅपर आर्या जाधव सहभागी झाली होती. 'बिग बॉस'च्या घरात आर्यानं अभिनेत्री  निक्की तांबोळीच्या कानशिलात मारली होती. त्यानंतर तिला थेट शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यानंतर आर्या खूप चर्चेत आली होती. 'बिग बॉस' संपलं असलं तरी रॅपर आर्याची चर्चा मात्र सगळीकडे असते. आताही आर्यानं अनेकाचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 मुळची अमरावतीची असलेली आर्या आता मुंबईकर झाली आहे. नुकतंच ती मुंबईमध्ये शिफ्ट झाली. आपल्या सामान शिफ्टिंगचा एक व्हिडीओ तिनं तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आर्या तिचं नवं घर सेटअप करताना दिसतेय. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.  

आर्या जाधव ही उद्योजक हेमंत जाधव यांची मुलगी आहे. आर्याची आई रश्मी या गृहिणी असून, तिचा लहान भाऊ शिवराज हा इंजिनिअर आहे. आर्याचा स्वतःचा बॅंडदेखील आहे. QK नावाचा तिचा स्वतःचा बॅंड आहे. आर्या रॅप, गाणी करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आर्या सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिचे चाहते आता आर्याला नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजनयु ट्यूब