Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाच्या कडेवर क्यूट पोनीटेलमध्ये दिसली राहा कपूर, मायलेकींचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:15 IST

रणबीर आणि आलियाची मुलगी राहा कपूर पुढील महिन्यात एक वर्षाची होणार आहे

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) सध्या तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या ती करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. तर वैयक्तिक आयुष्यातही ती लेकीच्या जन्मामुळे खूश आहे. आलियाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लेक राहाला (Raha Kapoor) जन्म दिला. अद्याप राहाचा चेहरा कोणालाही दिसला नसला तरी नुकतीच आलिया राहासोबत गाडीत बसताना दिसली. यावेळी चिमुकल्या राहाचा पोनीटेल लुक पाहून चाहते खूश झाले.

रणबीर आणि आलियाची मुलगी राहा कपूर पुढील महिन्यात एक वर्षाची होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी तिचा वाढदिवस आहे. दरम्यान राहाच्या जन्मानंतर आलियाने तिचे फोटो पब्लिश न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे तिचे फोटो, व्हिडिओ कधीच बाहेर आले नाहीत. नुकतंच आलिया राहाला कडेवर घेऊन गाडीत बसताना दिसली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करण्यात आलाय.

रणबीर आणि आलियाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केले. लग्नानंतर सात महिन्यातच तिने राहाला जन्म दिला. यानंतर काही काळ ब्रेक घेऊन ती पुन्हा कामावर परतली. आलियाच्या प्रोडक्शन अंतर्गत 'जिगरा' हा आगामी सिनेमा येणार आहे. यामध्ये आलियाच मुख्य भूमिकेत असणार आहे. तर रणबीर कपूर सध्या 'अॅनिमल' सिनेमामुळे चर्चेत आहे.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडसोशल मीडियापरिवार