Join us  

ट्विंकल खन्नाच्या बर्थडेला पती अक्षय कुमारचा मेसेज व्हायरल, वाचा मनातील शब्द....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 11:53 AM

अक्षय कुमारने सुद्धा सोशल मीडियावरून ट्विंटलला शुभेच्छा दिल्या असून त्याच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने पत्नी ट्विंकल खन्नासाठी एक जबरदस्त मेसेज लिहिला आहे.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाबॉलिवूडच्या फेमस कपल्सपैकी एक आहे. दोघे सोबत असतात तेव्हा त्यांची केमिस्ट्री प्रत्येकाला आवडते. ट्विंकल खन्नाचा आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने फॅन्स तिला सोशल मीडियावरून शुभेच्छा देत आहेत. अशात अक्षय कुमारने सुद्धा सोशल मीडियावरून ट्विंटलला शुभेच्छा दिल्या असून त्याच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने पत्नी ट्विंकल खन्नासाठी एक जबरदस्त मेसेज लिहिला आहे.

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबतचा फोटो शेअर केलाय. त्यासोबत त्याने लिहिले की, Here’s to another year of questionable life decisions. But I’m so glad I get to make all of them with you ♥️ Happy birthday Tina'. 

जानेवारीमध्ये अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला २० वर्षे होतील. अनेकजण दोघांना आदर्श कपल मानतात. दोघेही दोन आरव आणि नितारा यांचे पालक आहेत. बिझी शेड्यूलमधूनही अक्षय कुमार त्याच्या मुलांसाठी आणि परिवारांसाठी वेळ काढतो.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर अक्षय नुकतंच 'अतरंगी रे' सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. यात त्याच्यासोबत सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यासोबतच अक्षय कुमार सूर्यवंशी, बेल बॉटम बच्चन पांडे, रक्षा बंधन, पृथ्वीराज आणि राम सेतु सिनेमात दिसणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्नाबॉलिवूडसोशल मीडिया