Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारने सांगितलं सिनेमात येण्याचं कारण; केवळ ५ मिनिटात साइन केले होते तीन सिनेमे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 13:42 IST

अक्षय कुमार बेअर ग्रील्सच्या लोकप्रिय 'इन टू द वाईल्ड' शो मध्ये दिसला आणि त्याने आपलं खिलाडी रूप दाखवण्यासोबत करिअरबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या.

अक्षय कुमार बेअर ग्रील्सच्या लोकप्रिय 'इन टू द वाईल्ड' शो मध्ये दिसला आणि त्याने आपलं खिलाडी रूप दाखवण्यासोबत करिअरबाबतही अनेक गोष्टी सांगितल्या. या शोमध्ये अक्षय कुमारला अभिनेता होण्याआधीच्या लाइफबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अक्षयने अनेक प्रश्नांना उत्तरेही दिली आणि काही मजेदार गोष्टीही सांगितल्या.

अक्षयने सांगितले की, त्याच्या परिवार जुन्या दिल्लीत राहत होता. जुन्या दिल्लीतील या घरात एकत्र २४ लोक राहत होते. अक्षयची आई काश्मीरची होती तर वडील पंजाबी होते. अक्षयने या शोमध्ये सांगितले की, तो त्याच्या वडिलांना रोल मॉडल मानतो. त्यांनी जे काही त्याला शिकवलं तो ते पाळतो.

बेअर ग्रील्ससोबत झालेल्या संवादात अक्षयने त्याच्या बॉलिवूड करिअरबाबतही काही गोष्टी सांगितल्या. अक्षयने सांगितले की, त्याने अभिनेता होण्याचा निर्णय का घेतला? तो म्हणाला की, 'मी लहान मुलांना मार्शल आर्ट शिकवत होतो. त्यावेळी माझ्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी मला मॉडलिंगमध्ये हात आजमावण्याचा सल्ला दिला. मी एका स्टुडिओत गेलो आणि तिथे एक मुलगी आली. आम्ही दोघांनी सोबत काही पोज देऊन फोटो काढले. मला सायंकाळी २१००० रूपयांचा चेक देण्यात आला'.

तेव्हा अक्षयने विचार केला की, मार्शल आर्ट शिकवून त्याला केवळ ५ हजार रूपये मिळतात. तेच फोटो काढून इतके पैसे मिळतात. बस तेव्हाच त्याने याच क्षेत्रात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हेही सांगितले की, नटराज स्टुडिओमध्ये कुणीतरी एक रोल ऑफर केला. त्यामुळे तो मॉडलिंगमध्ये फार काम करू शकला नाही.

अक्षयने सिनेमाबाबत सांगितले की, ज्याने अभिनेता होण्याची ऑफर दिली होती. त्यानेच त्याची भेट प्रमोद चक्रवर्तीसोबत करून दिली. अक्षयने सांगितले की, प्रमोद चक्रवर्तीसोबत पहिल्या भेटीतच त्याने ५ मिनिटात ३ सिनेमे साइन केले होते. पण हे तिनही सिनेमे फ्लॉप झाले आणि चौथा सिनेमा थोडा ठिक चालला. त्यानंतर ऑफर येण्यास सुरूवात झाली.

हे पण वाचा :

अक्की करतो गोमूत्र प्राशन!, इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

फिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा

एका फॅनने शेअर केला अक्षयचा २८ वर्ष जुना ऑटोग्राफ, अभिनेता म्हणाला....

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड