Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आदित्यने माझा विचार केला नाही", 'धुरंधर' पदरात न पडल्यामुळे अक्षय कुमारची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:29 IST

Akshay kumar : आजवरच्या कारकिर्दीत अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. मात्र, त्याला धुरंधर सिनेमात काम करायची संधी न मिळाल्यामुळे त्याने खंत व्यक्त केली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) सध्या त्याच्या 'गोलमाल 5' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. आजवरच्या कारकिर्दीत अक्षयने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले आहेत. त्यामुळे कलाविश्वात त्याचा दबदबा आहे. विशेष म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्याला धुरंधर सिनेमात काम करायची संधी न मिळाल्यामुळे त्याने त्याची खंत व्यक्त केली आहे.

अलिकडेच अक्षयने 'इंडिया टुडे'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या धुरंधर सिनेमावर त्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने धुरंधर सिनेमाचं कौतुक तर केलंच. परंतु, या सिनेमात काम करण्याची संधी न मिळाल्यामुळे खंतही व्यक्त केली.

धुरंधरविषयी काय म्हणाला अक्षय?

अक्षयने दिलेल्या मुलाखतीमध्ये सिनेमाच्या बदलत्या ट्रेंडविषयी भाष्य केलं. यात त्याने धुरंधरचं उदाहरणदेखील दिलं. ''धुरंधर ही एक अॅक्शन मुव्ही आहे. यात रक्तपात, मारामारी असं बरंच काही आहे. हा चांगला सिनेमा असल्यामुळे लोकही त्याच्यावर प्रेम करतायेत. रणवीर सिंहसारख्या अभिनेत्याने अॅग्री यंग मॅन असलेली भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. मध्यंतरी अशा भूमिका कुठेतरी हरवल्या होत्या'', असं अक्षय म्हणाला.

या मुलाखतीमध्ये अक्षयला धुरंधरचा भाग का झाला नाहीस? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ''ल्यारी गँगचा भाग होण्यासाठी मी योग्य नाही, असं कदाचित आदित्यला वाटलं असेल. त्यामुळे त्याने माझा या सिनेमासाठी विचार केला नाही. आणि मला कोणताही रोल दिला नाही'', असं उत्तर अक्षयने दिलं. दरम्यान, या मुलाखतीमध्ये अक्षयने रणवीर सिंहचं तोंड भरुन कौतुक केलं. अक्षयचे सध्या अनेक सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. यात 'भूत बंगला' , 'गोलमाल 5', 'वेलकम टू द जंगल', 'हेरा फेरी 3'  या सिनेमांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar Regrets Missing 'Dhurandhar,' Says Aditya Didn't Consider Him

Web Summary : Akshay Kumar expressed regret for not being cast in 'Dhurandhar,' praising the film and Ranveer Singh's performance. He humorously suggested Aditya Chopra might not have found him suitable for the role. Akshay's upcoming films include 'Bhool Bhulaiyaa 3' and 'Hera Pheri 3'.
टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडरणवीर सिंगसेलिब्रिटीसिनेमा