Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच हिरोईनवर केली होती अक्षयने घाणेरडी कमेंट, बऱ्याच वर्षांनी अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 10:23 IST

मी शॉर्ट ड्रेस घातला होता कारण माझी भूमिका ही ग्लॅमरस होती.

1994 साली आलेल्या 'इक्के पे इक्का' सिनेमातअक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) अभिनेत्री शांतिप्रिया (Shantipriya) झळकली होती. आता नुकत्याच एका मुलाखतीत शांतिप्रियाने अक्षय कुमारवर गंभीर आरोप केले आहेत. सिनेमाच्या सेटवर तिला आलेल्या वाईट अनुभवांना तिने उजाळा दिला आहे. याचवेळी अक्षयने तिच्या रंगावरुन तिला हिणवले होते असाही खुलासा केला. अक्षयने तिच्या गुडघ्याच्या गडद रंगावर कमेंट केली होती.

शांतिप्रिया म्हणाली, 'इक्के पे इक्का सिनेमात क्लायमॅक्स सीन शूट होत होता. मी शॉर्ट ड्रेस घातला होता कारण माझी भूमिका ही ग्लॅमरस होती. मी स्किन टाईट शॉर्ट ड्रेस घातला होता. तर खाली स्किन कलरचे स्टॉकिन्स घातले होते. माझ्या गुडघ्यांचा रंग थोडा गडद होता. अक्षय कुमारचा स्वभाव जॉली आहे ही गोष्ट वेगळी पण जेव्हा १०० लोकांसमोर तुम्ही कोणालाही काहीही बोलू शकत नाही. अक्षय मला म्हणाला होता, शांति तुझ्या गुडघ्याला काही लागलं आहे का? मी जसं खाली बघितलं तर म्हणाला बघ किती काळे झाले आहेत आणि हसायला लागला. शांतिप्रियाने 'बॉलिवूड ठिकाना'शी संवाद साधताना याचा खुलासा केला.

शांतीने पुढे ९० च्या दशकात होणाऱ्या बॉडीशेमिंगवरही बातचीत केली. तेव्हा दाक्षिणात्या दिग्दर्शक सिनेमासाठी चांगल्या जाड मुली घ्यायचे. पण जेव्हा त्यांना कोणी स्लिम ट्रीम मुलगी हवी असायची ते मुंबईत यायचे. बॉलिवूडमधील अभिनेत्रींची निवड करुन ते त्यांना ग्लॅमरस लुक द्यायचे. मी साऊथमध्ये चित्रपट केले आहेत आणि माझ्या बहिणीनेही केले आहेत. आमची फिगर कधीच स्मॉल किंवा एक्स्ट्रॉ स्मॉल नसायची. 

शांतिप्रियाने 'इक्के पे इक्का' शिवाय सौगंध, 'फूल और अंगार' आणि 'मेरे सजना साथ निभाना' या सिनेमातही काम केले आहे. शांतिप्रियाने नंतर सिनेमात कमबॅक करण्यासाठी अक्षय कुमारकडे मदत मागितली होती. ती म्हणाली, ' हॉलिडे फिल्म सेटवर मी त्याला भेटले होते. आम्ही अर्धा तास गप्पा मारल्या. त्याने माझी ओळख सोनाक्षीशी करुन दिली. तेव्हा मी त्याला कमबॅक करायचं आहे हे सांगितलं. नंतर अक्षयच्या सेक्रेटरीचा मला फोनही आला होता.  ते मला एअरलिफ्ट फिल्ममध्ये घेण्याच्या विचारात होते. त्यांनी मला फोटो मागितला मी लगेच पाठवला. पण नंतर काय झालं माहित नाही अक्षयने कधीच मला फोनही केला नाही.'

टॅग्स :अक्षय कुमारसिनेमाबॉलिवूड