Join us
Daily Top 2Weekly Top 5

350 वर्ष जुन्या हवेलीत झालंय 'भूत बंगला'चं चित्रीकरण, नेमकी कुठे आहे ही हवेली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 09:29 IST

Bhooth bangla: 'भूत बंगला' या सिनेमाचं शूटिंग ज्या हवेलीमध्ये झालं आहे ती जवळपास  ३५० वर्ष जुनी आहे. याच हवेलीमध्ये २००७ मध्ये आलेल्या 'भूलभुलैय्या' या सिनेमाचं चित्रीकरण झालं होतं.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा भूतबंगला हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर अक्षय आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांना एकत्र काम करायची संधी मिळाली. हॉरर-कॉमेडी असलेल्या या सिनेमामध्ये सुपरनॅच्युरल फँन्टसी असल्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या सिनेमातील अनेक गोष्टी सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चिल्या जात आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे या सिनेमाचं शूटिंग झालेली हवेली.

'भूत बंगला' या सिनेमाचं शूटिंग ज्या हवेलीमध्ये झालं आहे ती जवळपास  ३५० वर्ष जुनी असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे या हवेलीसोबत अक्षय कुमारचं खास नातं आहे. याच हवेलीमध्ये त्याच्या २००७ मध्ये आलेल्या 'भूलभुलैय्या' या सिनेमाचं चित्रीकरण झालं होतं.

नेमकी कुठे आहे ही हॉरर हवेली?

भूत बंगलाचं चित्रीकरण झालेल्या या हवेलीमध्ये यापूर्वीही अनेक हॉरर सिनेमांचं चित्रीकरण झालं आहे. ही हवेली जयपूरपासून ४५ किलोमीटर दूर असून या हवेलीचं मूळ नाव चोमू पॅलेस असं आहे. ३५० वर्ष जुनी असलेल्या या हवेलीचं रुपांतर आता एका हॉटेलमध्ये झालं आहे. १६ व्या शतकात ही हवेली बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर २० व्या शतकात ती शाही निवास म्हणून ओळखली जाऊ लागली. आज ही वास्तू हेरीटेज हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे.

दरम्यान, अक्षय कुमारच्या भूत बंगला या सिनेमाने आतापर्यंत १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवतो याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar's 'Bhoot Bungalow' filmed in 350-year-old haveli: Location revealed!

Web Summary : Akshay Kumar's 'Bhoot Bungalow' was filmed in the 350-year-old Chomu Palace near Jaipur, previously featured in 'Bhool Bhulaiyaa'. Once a royal residence, the 16th-century haveli is now a heritage hotel. The film has earned over ₹15 crore.
टॅग्स :बॉलिवूडसिनेमाअक्षय कुमारगोळीबार