'छावा' सिनेमाची (chhaava movie) सध्या चांगलीच चर्चा आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी (laxman utekar) 'छावा' सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची गाथा रुपेरी पडद्यावर साकार केली. विकी कौशलने (vicky kaushal) 'छावा' सिनेमात साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चांगलीच गाजतेय. विकी कौशलच्या तोडीस तोड अभिनेता अक्षय खन्नाने (akshaye khanna) औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. अशातच आणखी एक बॉलिवूड अभिनेता आगामी सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. तो अभिनेता कोण? जाणून घ्या.
हा अभिनेता साकारणार औरंगजेब
अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका सध्या चांगलीच गाजतेय. अशातच बॉलिवूडमध्ये 'लॉर्ड' या नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता औरंगजेब साकारणार आहे. तो म्हणजे बॉबी देओल. ‘हरि हरा वीरा मल्लू’ या आगामी सिनेमात बॉबी देओल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील बॉबी देओलचा लूकही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. बॉबी देओलने साकारलेला औरंगजेब प्रेक्षकांना कसा वाटणार, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.