Join us
Daily Top 2Weekly Top 5

४० वर्षानंतर इशाने बांधली भावांना राखी; ओवाळणीत सनी,बॉबीने दिलं 'हे' गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:54 IST

इशाने तिला ओवाळणीमध्ये भावांनी काय गिफ्ट दिलं याचा खुलासा केला आहे.

सनी देओल याचा बहुप्रतिक्षीत ठरलेला 'गदर 2' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल ४० वर्षानंतर देओल भावंडं एकत्र आले. इशाने गदर २ चं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. यावेळी बॉबी, सनी, आहाना आणि इशा हे चारही सावत्र भावंडं एकत्र आले. इतकंच नाही तर या भावंडांमधील वाद मिटला असून नुकतंच त्यांनी रक्षाबंधनही साजरं केलं. त्यामुळे आता नेटकऱ्यांमध्ये सनी, बॉबीने इशाला नेमकं काय गिफ्ट दिलं याची चर्चा रंगली आहे.

अलिकडेच सगळ्यांनी मोठ्या थाटात रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यात इशाने सुद्धा सनी-बॉबीसोबत रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी या दोन्ही लाडक्या बहिणीला काय गिफ्ट दिलं हा प्रश्न अनेकांना पडला होता. याचं उत्तरं इशाने नुकतंच दिलं आहे. "लहान असताना आम्ही वडिलांना राखी बांधायचो. त्यामुळे मला वडील आणि भाऊ दोघांकडून गिफ्ट्स, पैसे मिळायचे. आता माझ्या भावांची संख्या जास्त झालीये. कारण, लग्नानंतर माझ्या आयुष्यात सासरच्या मंडळींची एन्ट्री झाली आहे", असं इशा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "रक्षाबंधनच्या वेळी ओवाळणीत मिळालेले पैसे मी कधीच खर्च करत नाही. त्यामुळे सनी, बॉबीने सुद्धा तिला ओवाळणीत पैसेच दिल्याचं समजून येतं." दरम्यान, गजर २ च्या निमित्ताने धर्मेंद्र यांची चारही मुलं पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले. त्यामुळे या सिनेमासोबतच या चारही भावंडांची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली. सनीचा गदर २ हा सिनेमा लवकरच ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमवणार आहे. आतापर्यंत या सिनेमाने ४८१.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

टॅग्स :इशा देओलसनी देओलबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी