दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. या शाही सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, अभिनेत्री क्रिती सेननने रश्मिकासाठी लिहिलेली एक भावुक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लग्नाच्या मंडपात रश्मिकाच्या डोळ्यांत पाणी पाहून क्रिती स्वतःला सावरू शकली नाही.
क्रिती सेननची भावुक पोस्ट
क्रिती सेननने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर केला आहे. तिने लिहिले, "उफ्फ्फ... या फ्रेममध्ये किती प्रेम आणि आनंद भरलेला आहे! रश्मिका आणि विजय, तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन. तुम्हाला आयुष्यभर अशा सुंदर आठवणी आणि प्रेम मिळो, ज्यामुळे तुम्हाला सदैव शांत आणि उत्साही वाटेल."
रश्मिकासोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना कृती पुढे म्हणाली, "रशू, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुझे ते डोळ्यांत पाणी असलेले हसू पाहून मी खूप भावुक झाले आणि माझेही डोळे पाणावले. तू मी भेटलेल्या सर्वात निर्मळ मनाच्या व्यक्तींपैकी एक आहेस आणि तू जगातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस. तुम्हा दोघांनाही खूप सारं प्रेम!"
विशेष म्हणजे, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना आगामी 'कॉकटेल २' या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली आहे. याच मैत्रीच्या नात्याने कृती आपल्या मैत्रिणीच्या लग्नाचे फोटो पाहून गहिवरून गेली. केवळ क्रितीच नाही तर समांथा रुथ प्रभू, रकुल प्रीत सिंग, आयुषमान खुराना आणि अर्जुन कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी 'विरोश' (Virosh) या जोडीला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. समांथाने रश्मिकाचा वधूच्या रूपातील फोटो शेअर करत "अभिनंदन" असे लिहिले आहे.
Web Summary : Kriti Sanon shared a heartfelt Instagram post congratulating Vijay Deverakonda and Rashmika Mandanna on their wedding. Overwhelmed by Rashmika's happiness, Kriti wished the couple a lifetime of love and beautiful memories. Many celebrities congratulated the couple.
Web Summary : कृति सेनन ने विजय देवरकोंडा और रश्मिका मंदाना को उनकी शादी पर बधाई देते हुए एक भावुक इंस्टाग्राम पोस्ट साझा किया। रश्मिका की खुशी से अभिभूत होकर, कृति ने जोड़े को जीवन भर प्यार और खूबसूरत यादों की शुभकामनाएं दीं। कई हस्तियों ने जोड़े को बधाई दी।