बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या १० वर्षांच्या करिअरनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने बॉलिवूडला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. हा अभिनेता आहे सूरज पांचोली (Sooraj Pancholi). सूरजने बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे त्याचे वडील आणि अभिनेते आदित्य पांचोली यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
सूरज पांचोलीचा मोठा निर्णय
सूरज पांचोलीने 'हीरो' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सलमान खानने सूरजला या सिनेमातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं होतं. परंतु आता सूरजने इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मागे एका मुलाखतीत सांगितलं की, 'हीरो' चित्रपटानंतर त्याला अपेक्षेप्रमाणे काम मिळालं नाही आणि काही विशिष्ट लोकांना तो चित्रपटसृष्टीत असणं आवडत नाही, त्यामुळे सूरजने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात सूरजने याविषयी अधिकृत घोषणा केली नाही तरीही त्याचे वडील आणि अभिनेता आदित्य पांचोली यांनी याविषयी सांगितलं आहे.
आदित्य पांचोलींची अप्रत्यक्ष टीका
सूरजच्या या निर्णयावर आदित्य पांचोली यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी 'तेजाब' या गाजलेल्या चित्रपटाचा उल्लेख करत अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आदित्य पांचोली म्हणाले, "मी तेजाब या सिनेमात माधुरी दीक्षितसोबत काम करणार होतो. मी या सिनेमासाठी पहिली पसंती होतो. पण एका अभिनेत्याच्या मोठ्या भावाने यात मध्यस्थी केली आणि त्या चित्रपटात माझ्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्यासोबत दिग्दर्शकाने काम केलं."
आदित्य पांचोलींनी पुढे सांगितलं की, "चित्रपटसृष्टीत अनेक लोक असे आहेत जे इतरांच्या करिअरमध्ये अडथळा आणतात. काही लोक अशा गोष्टी करतात ज्यामुळे नवीन कलाकारांना संधी मिळत नाही." आदित्य यांनी नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा हा निशाणा चित्रपटसृष्टीतील अनिल कपूर- बोनी कपूर या भावंडांवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान आदित्य यांचा लेक सूरजने मात्र इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
सूरज पांचोलीचे पुढील पाऊल
सूरजने बॉलिवूड सोडलं याबद्दल कमाल आर खानने ट्विट केलं होतं. हेच ट्विट आदित्य यांनी रिपोस्ट केल्याने या बातमीला पुष्टी मिळाली. आता बॉलिवूड सोडल्यानंतर सूरज पांचोली त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष देणार असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे, सूरजच्या 'हीरो' सिनेमातून सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीनेही पदार्पण केलं होतं. परंतु अथियानेही काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.
Web Summary : Sooraj Pancholi, launched by Salman Khan in 'Hero,' exits Bollywood after 10 years. Disappointed by limited opportunities, he will now focus on business ventures, a decision confirmed by his father, Aditya Pancholi.
Web Summary : 'हीरो' में सलमान खान द्वारा लॉन्च किए गए सूरज पंचोली ने 10 साल बाद बॉलीवुड छोड़ दिया। सीमित अवसरों से निराश होकर, वह अब व्यवसाय पर ध्यान केंद्रित करेंगे, उनके पिता आदित्य पंचोली ने पुष्टि की।